तळमाचीचे पुनर्वसन रखडले
By admin | Published: December 28, 2015 01:36 AM2015-12-28T01:36:50+5:302015-12-28T01:36:50+5:30
‘माळीण’सारख्या दुर्घटनेचे सावट घेऊन मागील आठ वर्षांपासून धोकादायक अवस्थेतत जीवन कंठणाऱ्या जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम भागात डोंगरदऱ्यांत वसलेल्या तळमाची
लेण्याद्री : ‘माळीण’सारख्या दुर्घटनेचे सावट घेऊन मागील आठ वर्षांपासून धोकादायक अवस्थेतत जीवन कंठणाऱ्या जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम भागात डोंगरदऱ्यांत वसलेल्या तळमाची गावच्या रखडलेल्या पुनर्वसनाची कामाची पाहणी गोपीनाथराव मुंडे संघर्ष समितीचे कार्यवाह बाळासाहेब अघाव यांनी केली.
माजी नगराध्यक्ष अनिल मेहेर, भाजपा तालुका संघटक संभाजी तांबोळी, माजी तालुका अध्यक्ष गंभीरमल कर्णावट, पंचायत समिती सदस्य संतोष वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास नवले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. सरपंच नढे यांनी तळमाची गावची व्यथा या वेळी मांडली. सन २००५ साली पावसाळ्यात तळमाची गावात जमिनीला मोठ्या भेगा पडून भूस्खलन होऊन गावातील वस्तीला धोका निर्माण झाला होता. अर्धवट अवस्थेत पडलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. येथील पर्यावरण परिस्थितीला अनुरूप असे बांधकाम करणे गरजेचे आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या समवेत तातडीने चर्चा करून माळीण पुनर्वसनाचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन बाळासाहेब अघाव यांनी ग्रामस्थांना दिले.