आता दंडाची रक्कम थेट गुगल अ‍ॅपवरून भरता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:57+5:302021-06-04T04:08:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संचारबंदीचा भंग केल्याबद्दल सध्या शहरात रस्त्यारस्त्यांवर नागरिकांची अडवणूक होतेय. महत्त्वाचे कारण असतानाही पोलीस सोडत ...

Penalties can now be paid directly from the Google app | आता दंडाची रक्कम थेट गुगल अ‍ॅपवरून भरता येणार

आता दंडाची रक्कम थेट गुगल अ‍ॅपवरून भरता येणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संचारबंदीचा भंग केल्याबद्दल सध्या शहरात रस्त्यारस्त्यांवर नागरिकांची अडवणूक होतेय. महत्त्वाचे कारण असतानाही पोलीस सोडत नाही. उलट दंडाची पावती फाडायला सांगतात. त्यात रोख पैसे नसतील, तर तेथेच असलेल्या पोलीस मित्राच्या वैयक्तिक खात्यात गुगल पे करायला सांगतात. त्यामुळे आपल्याला पावती मिळाली, तरी हा पैसा स्थानिक पोलिसांच्या खिशात जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावरही अशा तक्रारी आल्या असून त्यावर पोलिसांनी गुगल पे व अन्य अ‍ॅपद्वारे होणाऱ्या व्यवहारासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येणार आहे.

शहरात जवळपास ९६ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून, तेथे वाहनांची तपासणी केली जात आहे. या ठिकाणी पोलीस अडवणूक करतात. महत्त्वाचे काम असले तरी सोडत नाही. जबरदस्तीने ५०० रुपयांची पावती करायला सांगतात. पैसे नाहीत असे सांगितले तर, खासगी व्यक्तीला गुगल पे करायला सांगत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारण नसताना छोट्या कारणासाठी पावत्या फाडल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी सांगितले की, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. संबंधितांना पावती दिली जात असेल, तर त्याच्या पैशांचा भरणा पोलिसांच्या खात्यात करावा लागतो. ही तेथील त्या वेळची ॲडजेस्टमेंट असेल. त्याला भष्ट्राचार म्हणता येणार नाही. पण तरीही ती अनियमितता आहे.

या तक्रारींची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी सिस्टिम तयार करण्यात येत आहे. त्यानुसार भांडारकर रोडवरील एचडीएफसीच्या शाखेत स्वतंत्र खाते उघडण्यात येणार असून, पुणे पोलीस दलातील सर्व ३२ पोलीस ठाण्यांच्या नावाने स्वतंत्र कोड असणार आहे. त्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती दंड वसूल करण्यात आला. त्याची माहिती प्रत्येक दिवशी सायंकाळी समजू शकणार आहे. त्यामुळे लोकांना खासगी व्यक्तीच्या नावावर पैसे पाठवावे लागणार नाही. येत्या २ ते ३ दिवसांत ही योजना प्रत्यक्षात येणार आहे.

.....

वाहतूक शाखेमध्ये ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दंडात्मक कारवाईसाठी कॅशलेस व्यवस्था करण्यात आली आहे. तशीच व्यवस्था या दंडवसुलीसाठी करण्यात येणार असून येत्या २ ते ३ दिवसांत ही योजना आकाराला येणार आहे.

डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त

-------------------------------------

आईचा अपघात झाल्याने रविवारी नांदेड सिटीतून कासारवाडी येथे निघालो होतो़ कारमध्ये मी व पत्नी दोघेच होतो़ राजाराम पुलाच्या कोपऱ्यावर पोलिसांनी अडविले़ खूप सांगितले, तरी ते ऐकायला तयार नाही़ पुरावा मागत होते़ आता नुकताच अपघात झाल्याचे समजल्यानंतर पुरावा कोठून आणणाऱ २ हजार रुपये दंड मागितला़ गयावया केली तेव्हा ३०० रुपये घेतले़ पावती न देता घरी परत जायला सांगितले़ ही कसली अडवणूक, लॉकडाऊनचा आधार घेत कसली वसुल सुरू आहे?

-विजय शेंडगे, नागरिक

----------------

Web Title: Penalties can now be paid directly from the Google app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.