बेकायदा मुरूम, माती उत्खननप्रकरणी १ कोटी ९३ लाखांचा दंड
By admin | Published: January 13, 2017 02:06 AM2017-01-13T02:06:33+5:302017-01-13T02:06:33+5:30
अनधिकृतरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी कडाचीवाडी (चाकण) येथील चार जणांना १ कोटी ९३ लाख ९८
चाकण : अनधिकृतरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी कडाचीवाडी (चाकण) येथील चार जणांना १ कोटी ९३ लाख ९८ हजार रुपये जमीन महसुली थकबाकी म्हणून दंड केला असल्याची माहिती खेडचे तहसीलदार विठ्ठल ऊर्फ सुनील जोशी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कडाचीवाडी येथील जमीन गट क्रमांक १७ व १८ मधील ९९.६३ ब्रास माती तसेच ५९७.७८ ब्रास मुरूम अनधिकृतरीत्या उत्खनन केल्याप्रकरणी गोटीराम नामदेव खांडेभराड ( रा.कडाचीवाडी, चाकण), बबन रंगनाथ गंभीर व राजेंद्र बबन गंभीर (दोघेही रा. कडाचीवाडी, चाकण), काळूराम हैबती कौटकर (रा. काळुस, ता.खेड) यांच्याकडून गौण खनिज स्वामित्व धनाच्या पाच पट दंड वसूल करण्याचा आदेश खेडचे तहसीलदार जोशी यांनी दिला आहे. या गौण खनिज मालाची २ लाख ५५ हजार ५२ रुपये अशी मूळ किमंत (स्वामित्व धन) आहे. अशाच प्रकारे तालुक्यात अनेक ठिकाणी मुरूम, माती, डबर व टेकड्यांचे उत्खनन चालू आहे. (वार्ताहर)