हप्ता चुकवल्यास १५ हजारांचा दंड; पाच लाखांच्या कर्जासाठी दमदाटी करणाऱ्या सावकारावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:33 PM2022-11-10T15:33:35+5:302022-11-10T15:33:46+5:30

फिर्यादीने दरमहा १० टक्के दराने ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती

Penalty of 15 thousand in default of installments Action taken against moneylenders who tried hard for a loan of five lakhs | हप्ता चुकवल्यास १५ हजारांचा दंड; पाच लाखांच्या कर्जासाठी दमदाटी करणाऱ्या सावकारावर कारवाई

हप्ता चुकवल्यास १५ हजारांचा दंड; पाच लाखांच्या कर्जासाठी दमदाटी करणाऱ्या सावकारावर कारवाई

Next

पुणे : गरजेपोटी घेतलेल्या ५ लाख रुपयांच्या व्याजाचा हप्ता देणे चुकल्यास दरदिवशी १५ हजार रुपये दंडाची मागणी करणाऱ्या सावकारावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. प्रसाद किसन कुतळ (वय ४५, रा. जेधे पार्क, रास्ता पेठ) असे गुन्हा दाखल केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी एका दुग्ध व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीुनुसार, फिर्यादी यांचा दुग्ध व्यवसाय आहे. गरजेपोटी प्रसाद कुतळ यांच्याकडे ५ लाख रुपये मागितले. त्याने फिर्यादी यांना बँकेत बोलावले. दरमहा १० टक्के दराने ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. प्रथम दोन महिन्याचे व्याजाची रक्कम १ लाख रुपये रोख स्वरुपात घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यावर ५ लाख रुपये ट्रान्सफर केली. फिर्यादी यांनी त्यांना ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात एकूण ५ लाख ९५ हजार रुपये दिले. तरीही फिर्यादीकडून व्याजाचा हप्ता देणे चुकल्याने आरोपींने प्रत्येक दिवसाला १५ हजार रुपये दंड असे एकूण १८ लाख १० हजार रुपयांची फिर्यादीकडे मागणी केली. फिर्यादीच्या घरी येऊन शिवीगाळ करुन दमदाटी करीत. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व इतरांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Penalty of 15 thousand in default of installments Action taken against moneylenders who tried hard for a loan of five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.