पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:51 PM2021-08-25T18:51:26+5:302021-08-25T18:51:34+5:30

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रणजित शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक होणार आहे

The pending issues of primary teachers in Pune Zilla Parishad will be resolved; There will be a symposium of teachers tomorrow | पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार

पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार

Next
ठळक मुद्देफंड प्रस्ताव मंजुरीस होत असलेल्या विलंब तसेच प्रलंबित वैद्यकीय बिले लागावी मार्गी

बारामती : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत शिक्षक संघाची सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. फंड प्रस्ताव मंजुरीस होत असलेल्या विलंब तसेच प्रलंबित वैद्यकीय बिलासह पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी यावेळी चर्चा करण्यात येणार आहे.

गुरुवारी २६ तारखेला सहविचार सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रणजित शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक होणार आहे .त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न मार्गी लागतील अशी शिक्षकांना अपेक्षा आहे. फंड प्रस्ताव मंजुरीस होत असलेल्या विलंब तसेच प्रलंबित वैद्यकीय बिले मार्गी लागावीत. पात्र शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मिळावा अशी शिक्षकांची मागणी आहे.

''कोरोना काळात काम केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र मिळावे तसेच प्रलंबित रजा प्रस्ताव तात्काळ मंजूर व्हावेत व रजा मंजुरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे पंचायत समितीला देण्यात यावेत. अंशदायी पेन्शन योजनेतील मागील दोन वर्षाच्या हिशोब पावत्या मिळाव्यात, व्याज व शासन हीश्यासह सर्व रकमा एन पी एस योजनेतील खात्यांवर जमा करण्यात याव्यात यांसह इतरही प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात येणार असून जिल्हा परिषदेतील प्रमुख अधिकारी वर्गाची या बैठकीस उपस्थिती राहणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.''

''जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांचे लाभ कायम ठेवण्यात यावा, महानगरपालिका क्षेत्र वाढीव हद्दीतील शाळा शिक्षकांसह वर्ग कराव्यात, पूर्वीच्या कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त न ठरविता रिक्त जागांवर मुख्याध्यापक व विज्ञान पदवीधर पदोन्नती तातडीने करावी ,या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक संघ आग्रही आहे असे पुणे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले.''

Web Title: The pending issues of primary teachers in Pune Zilla Parishad will be resolved; There will be a symposium of teachers tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.