प्रलंबित प्रश्नांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:38+5:302021-08-26T04:13:38+5:30
बारामती: शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत शिक्षक संघाच्या सहविचार सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. फंड प्रस्ताव मंजुरीस होत असलेला ...
बारामती: शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत शिक्षक संघाच्या सहविचार सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. फंड प्रस्ताव मंजुरीस होत असलेला विलंब, तसेच प्रलंबित वैद्यकीय बिलासह पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या वेळी चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रणजित शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक होणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न मार्गी लागतील अशी शिक्षकांना अपेक्षा आहे. फंड प्रस्ताव मंजुरीस होत असलेला विलंब तसेच प्रलंबित वैद्यकीय बिले मार्गी लागावीत. पात्र शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मिळावा अशी शिक्षकांची मागणी आहे.
कोरोनाकाळात काम केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र मिळावे, तसेच प्रलंबित रजा प्रस्ताव तत्काळ मंजूर व्हावेत व रजामंजुरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे पंचायत समितीला देण्यात यावेत. अंशदायी पेन्शन योजनेतील मागील दोन वर्षांच्या हिशोब पावत्या मिळाव्यात, व्याज व शासन हिश्श्यासह सर्व रकमा एनपीएस योजनेतील खात्यांवर जमा करण्यात याव्यात यांसह इतरही प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात येणार असून जिल्हा परिषदेतील प्रमुख अधिकारी वर्गाची या बैठकीस उपस्थिती राहणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली
जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांचे लाभ कायम ठेवण्यात यावा, महानगरपालिका क्षेत्र वाढीव हद्दीतील शाळा शिक्षकांसह वर्ग कराव्यात, पूर्वीच्या कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त न ठरविता रिक्त जागांवर मुख्याध्यापक व विज्ञान पदवीधर पदोन्नती तातडीने करावी या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक संघ आग्रही आहे.
बाळासाहेब मारणे
जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे