बेवारस आणि गोरगरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी पेन्शनमधून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:41+5:302021-03-08T04:11:41+5:30

राजगुरुनगर : बेवारस आणि गोरगरिबांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन सामाजिक बांधिलकी दाखविणाऱ्या पोलीस आणि येथील अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी ...

Pension assistance for the funeral of the homeless and the poor | बेवारस आणि गोरगरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी पेन्शनमधून मदत

बेवारस आणि गोरगरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी पेन्शनमधून मदत

Next

राजगुरुनगर : बेवारस आणि गोरगरिबांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन सामाजिक बांधिलकी दाखविणाऱ्या पोलीस आणि येथील अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्य पाहून एका सेवानिवृत्त प्राध्यापकांनी आपली सेवानिवृत्तीच्या मानधनातील काही रक्कम प्रत्येक वर्षी या गोरगरीब आणि बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी देण्याचे दातृत्व दाखविले आहे. त्याची सुरुवात म्हणून अकरा हजार रुपयांचा धनादेश पोलीस निरीक्षकांच्या वतीने अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

राजगुरुनगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक सुरेश गुजराथी व त्यांच्या पत्नी मीनाक्षी गुजराथी हे नेहमी विविध सामाजिक संस्थांना आपल्या परीने मदत करत असतात.

'गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बेवारस आणि गोरगरिबांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा वेळी पोलिस आणि राजगुरुनगर मधील अमरज्योत चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीवर अंत्यसंस्कार करुन मोठी सामाजिक जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे या संस्थेसाठी काही मदत करता येईल का? असा अनेक दिवसांपासून विचार त्यांच्या मनात घोळत होता. वयोमान आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यात त्यांना थेट सहभाग घेता येत नव्हता. म्हणून आम्ही दांपत्याने एकविचार करून या कार्यासाठी प्रत्येक वर्षी काही रक्कम आपल्या सेवानिवृत्तीच्या मानधनातून देण्याचे ठरविले.' असे यावेळी बोलताना प्रा. गुजराथी यांनी सांगितले.

त्याप्रमाणे पहिला अकरा हजार रुपयांचा धनादेश अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. हा धनादेश पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्टचे रविंद्र गुजराथी, खेड तालुका ग्राहक हक्क समितीचे अध्यक्ष रंगनाथ सुतार, श्रीकांत गुजराथी, छगनलाल ओसवाल, सागर मणियार, अशोक दुगड, विद्याधर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

बेवारस आणि गोरगरिबांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेला मदतीचा धनादेश देताना सेवानिवृत्त प्रा. सुरेश गुजराथी व इतर.

Web Title: Pension assistance for the funeral of the homeless and the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.