जनता पाण्याविना, तर जनावरे चारा-पाण्याविना कासावीस

By admin | Published: May 13, 2016 01:07 AM2016-05-13T01:07:14+5:302016-05-13T01:07:14+5:30

दौंड तालुक्याच्या जिरायती भागामध्ये वाढत्या तापमानाबरोबरच तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असणारे सर्वच स्रोत आटले आहेत

People are not without water, animals feed without water - without water | जनता पाण्याविना, तर जनावरे चारा-पाण्याविना कासावीस

जनता पाण्याविना, तर जनावरे चारा-पाण्याविना कासावीस

Next

वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायती भागामध्ये वाढत्या तापमानाबरोबरच तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असणारे सर्वच स्रोत आटले आहेत. पाळीव प्राण्यांबरोबरच वन्य प्राण्यांनाही चारा व पाण्याअभावी जीवन जगणे मुश्कील झाले आहे.
शासनामार्फत ५० पैशापेक्षा कमी पैैसेवारी असलेल्या गावातील नागरिकांसाठी व जनावरांसाठी पुरेसे पाणी व चारा पोहोचवण्याचे
नियोजन करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले.
मात्र, अद्यापही या भागामध्ये
ठोस दुष्काळी योजना अमलात
येताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यासाठी शासनाने
तत्काळ नागरिकांसाठी पिण्याचे
पाणी व जनावरांसाठी चारा व
पाणी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
(वार्ताहर)

Web Title: People are not without water, animals feed without water - without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.