सूर्यनारायणाचा नयनरम्य आविष्कार ! बारामतीत सप्तरंगी कोंदणातील सूर्याचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 07:21 PM2021-06-23T19:21:47+5:302021-06-23T20:49:04+5:30

इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंगात गुंफलेला सूर्य पाहुन बारामतीकर आनंदुन गेले.

The people of Baramati experienced the sun in the rainbow | सूर्यनारायणाचा नयनरम्य आविष्कार ! बारामतीत सप्तरंगी कोंदणातील सूर्याचे दर्शन

सूर्यनारायणाचा नयनरम्य आविष्कार ! बारामतीत सप्तरंगी कोंदणातील सूर्याचे दर्शन

Next

बारामती : बारामतीकरांनी बुधवारी(दि २३) सप्तरंगी कोंदणातील सूर्य अनुभवला. अनेकांनी प्रथमच हा अनुभव घेतल्याने दिवसभर हा सूर्य सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.याबाबत चर्चा रंगली होती.

पावसातील इंद्रधनुष्य अनेक वेळा पाहिले आहे.हे इंद्रधनुष्य पाहणे म्हणले सुखद  अनुभव असतो.केवळ पावसाळ्यात हे इंद्रधनुष्य पाहता येते. मात्र, इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंगात गुंफलेला सूर्य पाहुन बारामतीकर आनंदुन गेले.दुपारी १२.३० च्या सुमारास आकाशात सूर्याभोवती सप्तरंगातील कडे निर्माण झाले.यावेळी अनेकांना या सुर्याचे छायाचित्रण करण्याचा मोह आवरला नाहि.हे दृश्य पाहताना आनंददायी अनुभव असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र,याबाबतचे अनेकांच्या मनातील प्रश्नचिन्ह कायम होते. बारामतीत आज दुपारी सूर्य प्रखर व आकाशात ढग होते. मात्र, सूूर्याभोवती मात्र काही काळ अजिबातच ढग नव्हते व याच काळात सप्तरंगी कडे पडले होते.

शहर व परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास सूर्याभोवती सप्तरंगी खळे पडले होते. सन हलो याचा हा प्रकार असल्याचे काही खगोलशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितले. काही जणांनी पावसाळ्यातील इंद्रधनुष्य तर, याला ब्रम्हधनुष्याचेही नाव देण्याची मजल गाठली. दुपारी सूर्याभोवती हे तेजोमय सप्तरंगी खळे काही जणांना दिसल्यानंतर फोनाफोनी सुरु झाली. याबाबत माहिती झाल्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून या घटनेचे छायाचित्रण केले.अनेकांना आयुष्यात पहिल्यांदाच असा सूर्याभोवतीचे गोलाकार सप्तरंगीकडे पाहण्याचा अनुभव घेत असल्याचे सांगितले. सूर्याभोवती गोलाकार तेजोवलय म्हणजे २२ अंशांचे खळे अनेक शहरात यापूवीर्ही पाहिले गेल्याची चर्चा होती.

Web Title: The people of Baramati experienced the sun in the rainbow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.