नागरिकांचे पळाले तोंडचे पाणी

By Admin | Published: March 3, 2016 01:29 AM2016-03-03T01:29:53+5:302016-03-03T01:29:53+5:30

चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत

People fleeing water | नागरिकांचे पळाले तोंडचे पाणी

नागरिकांचे पळाले तोंडचे पाणी

googlenewsNext

पिंपरी : चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अगोदरच नियमितपणे पाणीपुरवठा होत नसताना बिलेही चुकीची येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. चुकीच्या बिलांमुळे फुगवटा वाढल्याने थकबाकी वसुलीत पाणीपुरवठा विभागास अपयश आले आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पाणीकपातीबाबत याच आठवड्यात बैठक होणार आहे.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी पवना नदीद्वारे रावेत येथील बंधाऱ्यांवरून उचलून शुद्धीकरण करून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने दिवसातून एकवेळ पाणी पुरवठ्याचे नियोजन केले. त्यानुसार शहरात एकवेळ पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्याने पाटबंधारे विभागाने तातडीची बैठक घ्यावी, अशी सूचना पालिकेला केली आहे.
पाणीपुरवठा नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने बैठक घ्यावी, अशी सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, पाणीपुरवठा अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक या आठवड्यात होणार आहे. चर्चेनंतर पाणीकपातीबाबत निर्णय होईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एक वेळ पाणीपुरवठ्याचे धोरण जाहीर करतानाच बांधकामासाठी वापरणाऱ्यांवर कारवाई करू. बिले न भरणारांचे नळजोड तोडू, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, यापैकी कोणतीही कारवाई विभागाने केलेली नाही. २०१४-१५ या वर्षात पाणीपट्टी आणि इतर वसुलीतून ६० कोटींचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागासमोर होते. मात्र, त्यांपैकी केवळ ३२ कोटींची वसुली
झाली होती. २०१५-१६ या
वर्षांसाठी ६५ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यात कपात करून ५६ कोटी करण्यात आले. मात्र, आजपर्यंत २५ कोटींची वसुली झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: People fleeing water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.