‘त्या’ मुलांच्या भविष्यासाठी एकवटले ग्रामस्थ

By admin | Published: November 15, 2016 03:28 AM2016-11-15T03:28:40+5:302016-11-15T03:28:40+5:30

अनावश्यक खर्च टाळून जमलेले तीस हजार रुपये विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या रणगाव येथील कदम दाम्पत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित ठेवीच्या

The people gathered for the future of 'those' children | ‘त्या’ मुलांच्या भविष्यासाठी एकवटले ग्रामस्थ

‘त्या’ मुलांच्या भविष्यासाठी एकवटले ग्रामस्थ

Next

इंदापूर : अनावश्यक खर्च टाळून जमलेले तीस हजार रुपये विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या रणगाव येथील कदम दाम्पत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित ठेवीच्या रूपाने मदत करण्यात आली. रणगाव येथील ब्रह्मदेव मित्र मंडळ, अभिजित तांबिले मित्र परिवार व ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला.
गणेशोत्सवादरम्यान ओढ्यावरची विद्युत मोटर चालू करताना रणगाव येथील गणेश तानाजी पवार यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी सरसावलेल्या त्यांची पत्नी शुभांगी यांनाही विजेचा धक्का बसला. दोघेही मृत्युमुखी पडले. त्यांचा ३ वर्षांचा मुलगा शुभम व दीड वर्षाची मुलगी पायल हे दोघेही अनाथ झाले. ब्रह्मदेव मित्र मंडळ व ग्रामस्थांनी या चिमुकल्यांना मदतीचा निर्णय घेतला. दिवाळीसारख्या खर्चिक सणात अनावश्यक खर्च टाळून रक्कम एकत्रित केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभिजित तांबिले यांना त्याची कल्पना दिली. त्यांनीही मित्र परिवाराच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. तीस हजार रुपये जमा झाले. ते कदम यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित ठेवीच्या रूपात बँकेत ठेवले. कदम यांच्या घरी जाऊन तांबिले यांच्या हस्ते पावती त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द केली.
जयदादा फडतरे, सचिन गोसावी, लहुचंद्र रणमोडे, राहुल रणमोडे, राजेंद्र हगवणे, संजय रणमोडे, शशिकांत रकटे, संदीप मचाले, अनिकेत रणमोडे, किशोर हगवणे, प्रदीप पवार, वैभव कदम, दिलीप सावंत, व्यंकटेश पवार, प्रमोद रकटे, सचिन रकटे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The people gathered for the future of 'those' children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.