रस्त्यांच्या कामात अडकला लोकसहभाग
By admin | Published: February 12, 2015 02:34 AM2015-02-12T02:34:44+5:302015-02-12T02:34:44+5:30
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचाही सहभाग असावा, या उद्देशाने सहा वर्षांपूर्वी महापालिकेने अंदाजपत्रकात नागरिकांनी सुचविलेल्या
पुणे : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचाही सहभाग असावा, या उद्देशाने सहा वर्षांपूर्वी महापालिकेने अंदाजपत्रकात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा सहभाग घेण्याचा उपक्रम सुरू केला. त्यासाठी प्रत्येक प्रभागास तब्बल ५० लाखांच्या निधीची तरतूदही करण्यात आली. मात्र, हा निधी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीवरच जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
एकीकडे शहरातील रस्त्यांसाठी पालिकेकडून तीनशे ते चारशे कोटी, क्षेत्रीय कार्यालयांकडून जवळपास ५० ते १०० कोटी आणि आमदार, तसेच खासदार निधीतून खर्च केला जात असताना, दुसरीकडे लोकसहभागाच्या निधीवर रस्त्यांसाठी डल्ला मारला जात आहे. २००८ ते २०१३-१४ कालावधीत लोकसहभागांतर्गत पालिकेने २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील जवळपास ७० कोटी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी प्रस्तावित करण्यात आली होती. ती पूर्णही करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)