भीमापाटसवर लोकांना ताटकळत ठेवले

By admin | Published: October 7, 2014 06:22 AM2014-10-07T06:22:05+5:302014-10-07T06:22:05+5:30

कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्यावर कामकाजानिमित्ताने भेटीसाठी आलेल्या लोकांना ताटकळत ठेवण्या पलीकडे काहीही केले नाही.

People kept on the Bhimapatas | भीमापाटसवर लोकांना ताटकळत ठेवले

भीमापाटसवर लोकांना ताटकळत ठेवले

Next

पाटस : भीमापाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्यावर कामकाजानिमित्ताने भेटीसाठी आलेल्या लोकांना ताटकळत ठेवण्या पलीकडे काहीही केले नाही. तेव्हा
ही मंडळी तालुक्याचा विकास
कसा करतील, असा प्रश्न पाटसचे माजी सरपंच योगेंद्र शितोळे यांनी उपस्थित केला.
पाटस (ता. दौंड) परिसरातील डोंगरेश्वर येथे झालेल्या घोंगडी बैठकीत ते बोलत होते. शितोळे म्हणाले,‘‘ आमदार रमेश थोरात यांच्या अथक प्रयत्नातून पाटससाठी सव्वा पाच कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. गेल्या महिन्यातच या योजनेचे भूमिपूजन झाले आहे. भविष्यात पाटस आणि परिसरातील वाड्यावस्त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. पाणी प्रश्न असो किंवा अन्य विकासकामे यात रमेश थोरात यांनी कधीही राजकारण केले नाही.
सत्वशील शितोळे म्हणाले, पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी कुठलेही विकासाचे केले नाही. त्यातच या मंडळींनी पवार कुटुुंबियांची साथ सोडल्याने त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आमदार रमेश थोरात यांनी कुठल्याही विकास कामात राजकारण केलेले नाही. त्यामुळे तालुक्यात विकासाची कामे झाली आहे. भविष्यात पाटसच्या डोंगरेश्वर भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. प्रशांत शितोळे, शहाजी चव्हाण, सुभाष रंधवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब भागवत, जाकीर तांबोळ, मंगेश दोशी, शिवाजी ढमाले, संपत भागवत, भूषण पानसरे, बाळासाहेब भागवत, प्रशांत खरात, माणिक भागवत, खामकर, बाळासाहेब चव्हाण, संतोष शितकल, प्रकाश भागवत उपस्थित होते.

Web Title: People kept on the Bhimapatas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.