लोकांनीच पुढाकार घेऊन लोकशाही मार्गाने अफगाणिस्तान उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:59+5:302021-08-24T04:14:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अफगाणिस्तानातील नागरिकांनी देशाचे हित लक्षात घेत त्यानुसार लोकशाही मार्गाने आपला देश उभा करावा लागेल. ...

The people must take the initiative and build Afghanistan in a democratic way | लोकांनीच पुढाकार घेऊन लोकशाही मार्गाने अफगाणिस्तान उभारावा

लोकांनीच पुढाकार घेऊन लोकशाही मार्गाने अफगाणिस्तान उभारावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अफगाणिस्तानातील नागरिकांनी देशाचे हित लक्षात घेत त्यानुसार लोकशाही मार्गाने आपला देश उभा करावा लागेल. कारण प्रत्येक देश हा आपापले हित जपत असतो व त्यानुसार देशाचे धोरण ठरवतो, असे मत आंतरराष्ट्रीय धोरण अभ्यासक डॉ. शेषाद्री चारी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अफगाणी विद्यार्थ्यांशी संवाद आणि ‘जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक इम्पॅक्ट ऑफ अफगाणिस्तान क्रायसिस’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्राध्यापक अरविंद कुमार, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, एअर मार्शल भूषण गोखले, अल्युमिनाय असोसिएशनचे संचालक संजय ढोले उपस्थित होते.

डॉ. शेषाद्री चारी म्हणाले, अफगाणिस्तानात अमेरिकेने आतापर्यंत अनेक वेळा सैन्य पाठवले होते तसेच परत मागे घेतले. मात्र, त्यांनी अफगाणी नागरिकांना स्वतःचं सरकार व स्वतःचे सैन्य स्थापन करण्यासाठी मदत करायला हवी होती. परंतु ती झालेली नाही.

प्रा. अरविंद कुमार म्हणाले, तालिबानींना जर भारताशी संबंध टिकवायचे असतील तर त्यांना लोकशाही मार्गानेच काम करावे लागेल. तालिबान्यांना आवर घातला, तरच भविष्यात अफगाणिस्तानात लोकशाही प्रस्थापित होऊ शकेल.

----------------

पुण्यात दोन हजार अफगाणी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या व्हिसा संपणे, राहण्याची सोय नसणे तसेच काही आर्थिक अडचणी आहेत. त्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार आहोत.

- प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: The people must take the initiative and build Afghanistan in a democratic way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.