भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांचा दबाव; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 03:35 PM2022-02-23T15:35:45+5:302022-02-23T15:37:23+5:30
पुण्याची अनेक पोलीस ठाणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या भूमिकेतून काम करत असल्याची टीका
पुणे : पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. शहरातल्या विकासाकामाबाबत आढावा घेण्यासाठी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा, यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून दबाव आणण्यात येत आहे. असा गंभीर आरोप केला आहे. पुण्याची अनेक पोलीस ठाणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या भूमिकेतून काम करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
पाटील म्हणाले, राज्य सरकार आता सत्तेचा गैरवापर करू लागले आहे. या विरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे. गेल्या २७ महिन्यात या सरकारने एकही न्यायालयीन खटला जिंकलेला नाही. प्रत्येक ठिकाणी सरकारला पराभूत व्हावे लागले. आता महापालिका निवडणूकही जवळ आली आहे. पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे काम राष्ट्रवादीकडून पद्धतशीरपणे सुरू आहे. पुणे पोलिसही त्यांना मदत करत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या पन्नास वर्षातील कामे हाच या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा राहणार
पुणे महापालिकेत भाजपचे पाच वर्षांचे काम आणि गेल्या पन्नास वर्षातील कामे हाच या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा राहील. पालिकेने गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीने विकासाची मोठी कामे उभी केली आहेत. निश्तचतपणे पुणेकर भाजपलाच संधी देतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणातही राज्य सरकारला अपयश
ओबीसी आरक्षण तसेच मराठा आरक्षणाच्या विषयात देखील राज्य सरकारला यश आले नाही. सामान्य मराठा तसेच ओबीसी तरूणांना यामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.