देश लुटणाऱ्या मोदी सरकारची माहिती जनतेला द्यायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:23+5:302021-07-24T04:08:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: काँग्रेसने मोठ्या मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार मोडायलाच नाही, तर लुटायला निघाले आहे. सनियंत्रण समितीच्या ...

The people should be informed about the Modi government looting the country | देश लुटणाऱ्या मोदी सरकारची माहिती जनतेला द्यायला हवी

देश लुटणाऱ्या मोदी सरकारची माहिती जनतेला द्यायला हवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: काँग्रेसने मोठ्या मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार मोडायलाच नाही, तर लुटायला निघाले आहे. सनियंत्रण समितीच्या सदस्यांंनी जनतेमध्ये जाऊन त्याची माहिती द्यायला हवी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

काँग्रेस सरकारने केलेल्या योजनांच्या प्रचारासाठी स्थापन केलेल्या योजना संनियंत्रण समितीचे पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी पुण्यात पुनरुज्जीवन करण्यात आले. आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी व अन्य प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. पटोले म्हणाले, समितीच्या सदस्यांनी आता पुन्हा सक्रिय व्हायची वेळ आली आहे. काँग्रेसने ७० वर्षात देशाची बांधणी केली. सत्तेचा वापर नेहमीच सामान्यांसाठी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा मोदी सरकारच्या माध्यमातून हे सगळे मोडीत काढत आहे. देशाला लुटत आहेत, याची माहिती समितीच्या सदस्यांनी जनसेवक होऊन जनतेला द्यावी.

राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ॲड. अभय छाजेड यांनी आभार मानले.

Web Title: The people should be informed about the Modi government looting the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.