लोकसहभागातून ‘जलयुक्त’ व्हावे
By admin | Published: October 16, 2015 01:14 AM2015-10-16T01:14:49+5:302015-10-16T01:14:49+5:30
जलयुक्त शिवारांतर्गत जिल्ह्यातील काम मोठे आहे; मात्र हे काम लोकसहभागातून झाले पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम शासकीय पातळीवर न राहता जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत राबविला गेला पाहिजे
सुपे : जलयुक्त शिवारांतर्गत जिल्ह्यातील काम मोठे आहे; मात्र हे काम लोकसहभागातून झाले पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम शासकीय पातळीवर न राहता जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत राबविला गेला पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले.
भोंडवेवाडी (ता. बारामती) येथे शासन स्तरावरील राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवारांतर्गत कामांची पाहणी सौरव राव यांनी केली. या वेळी ग्रामस्थांनी राबविलेल्या कामाची प्रशंसा करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
शासनाच्या जलयुक्त शिवारांतर्गत येथील काळूबाई ओढ्याच्या १६०० मीटर लांब आणि ३० फूट रुंदीच्या खोलीकरणाची पाहणी राव यांनी केली. तसेच, बालोबा तलावाच्या दुरुस्तीची पाहणी या वेळी केली. या कामामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती येथील सरपंच संगीता खांडेकर, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब भोंडवे यांनी दिली.
याप्रसंगी प्रांताधिकारी संतोष जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत,
नायब तहसीलदार व्ही. एन. करे, सरपंच संगीता खांडेकर, उपसरपंच श्रद्धा कुतवळ, सदस्य बाळासाहेब भोंडवे, हनुमंत कुतवळ, विलास जाधव, सुनीता घोडके, अप्पासाहेब शेळके, सदाशिव शेळके, रमेश
मेरगळ, दिलीप भोंडवे, राहुल भोंडवे, दत्तात्रय कुतवळ, बबन भोंडवे, हरिभाऊ भोंडवे, सुनील खांडेकर, कालिदास भोंडवे, ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर उपस्थित होते.
(वार्ताहर)