प्लास्टिकची जागा घेतली कागदाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 05:49 PM2018-06-23T17:49:39+5:302018-06-23T17:54:36+5:30

प्लास्टिक बंदीची अंमजबजावणी शनिवारपासून सर्वत्र करण्यात येत अाहे. या प्लास्टिक बंदीला पुणेकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून कापडी पिशव्या वापरण्यावर पुणेकर अाता भर देत अाहेत.

people using paper plates instead of plastic | प्लास्टिकची जागा घेतली कागदाने

प्लास्टिकची जागा घेतली कागदाने

Next

पुणेः प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी शनिवारपासून राज्यात करण्यात अाली असून ज्या व्यक्तिकडे बंदी असलेली प्लास्टिकची वस्तू अाढळेल त्या व्यक्तीला 5 हजारांचा दंड ठाेठावण्यात येणार अाहे. या प्लॅस्टिक बंदीला पुणेकरांनी स्वीकारले असून पुणेकर खरेदीसाठी कापडी पिशव्या घेऊन घराबाहेर पडल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर पुण्यातील प्लास्टिकसाठी प्रसिद्ध असलेल्या भाेरी अाळीत सुद्धा प्लास्टिकची जागा अाता कागदी प्लेट अाणि वस्तूंनी घेतली अाहे. 


    प्लास्टिकची विल्हेवाट लावणे शक्य नाही. तसेच प्लाॅस्टिकच्या पिशव्या, चहाचे कप व इतर प्लास्टिकची अावरने यांच्यामुळे नाले तुंबतात. खासकरुन पावसाळ्यामध्ये हे प्लास्टिक अडकून ताले तुंबल्याचे व त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार वारंवार समाेर अाले अाहेत. त्यातच या प्लास्टिकमुळे जलप्रदूषणही माेठ्याप्रमाणावर हाेत असते. त्यामुळे या सर्व कारणांचा विचार करुन राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. या बंदीमध्ये विघटन व पुर्नवापर करता न येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात अाली अाहे. तसेच ज्या व्यक्तीकडे हे प्लास्टिक अाढळेल त्यांच्यावर पहिल्यांदा 5 हजार दुसऱ्यावेळेस अाढळल्यास 10 हजार अाणि तिसऱ्या वेळेस हजार 25 हजार रुपये अथवा कारावास अशी कारवाई हाेऊ शकते. पुण्यात प्लास्टिक बंदीचे पुणेकरांनी स्वागत केल्याचे चित्र असून पुण्याच्या बाजारपेठांमध्ये नागरिक खरेदीसाठी कापडी पिशव्या घेऊन येत अाहेत. तसेच अनेक दुकानचालकांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर प्लास्टिकच्या वस्तूंएेवजी कागदी वस्तू दुकानात विक्रीस ठेवण्यास सुरुवात केली. 


    प्लास्टिकच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील भाेरी अाळीतील बहुतांश दुकानदारांनी बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू दुकानात ठेवल्या नाहीत. थर्माकाॅलच्या जेवणाच्या प्लेट्स, प्लास्टिकचे चहाचे कप, सजावटीसाठी लागणारे थर्माकाॅल अादी वस्तू घेण्यासाठी नागरिक या भाेरी अाळीत येत असत. तसेच ग्राहकांना वस्तू प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये देण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या खरेदीसाठी रिटेलर दुकानदारांची येथे गर्दी हाेत असते. परंतु या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर येथील दुकानदारांनी प्लास्टिक एेवजी कागदी प्लेट्स व कप दुकानांमध्ये विक्रीस ठेवल्याचे चित्र अाहे. तसेच थर्माकाॅल एेवजी कागदी सजावटीचे साहित्य येथे ठेवण्यात अाले अाहे. नाव न सांगण्याच्या अटीवर येथील एक दुकानदार म्हणाले, प्लास्टिक बंदीच्या घाेषणेनंतर येथील दुकानदारांनी बंदी घातलेले प्लास्टिक विकण्यास बंद केले. ग्राहकांकडून थर्मकाॅलच्या जेवणाच्या प्लेट्स, तसेच प्लास्टिकच्या चहाच्या कप यांना माेठी मागणी असायची अाता मात्र या प्लेट्स एेवजी कागदी प्लेट्स व कागदी चहाचे कप बाजारात उपलब्ध अाहेत. त्यामुळे दुकानदारांना या प्लास्टिक बंदीचा फारसा फटका बसलेला नाही. 


    प्लास्टिक बंदीमुळे कापडी पिशव्यांना माेठ्याप्रमाणावर मागणी वाढली अाहे. शहरातील विविध चाैकांमध्ये कापडी पिशव्या विकणाऱ्यांची संख्या वाढली अाहे. तसेच कपड्याच्या दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्यांएेवजी अाता कापडी पिशव्यांचा वापर करण्यात येत अाहे. 

Web Title: people using paper plates instead of plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.