भाववाढीने जनता येईल रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:37+5:302021-07-04T04:07:37+5:30
पुणे : केंद्र सरकारचे जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरील नियंत्रण सुटले आहे. आता या महागाईमुळे जनताच केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, ...
पुणे : केंद्र सरकारचे जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरील नियंत्रण सुटले आहे. आता या महागाईमुळे जनताच केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.
पक्षाच्या शहर शाखेने झाशीची राणी चौकात केंद्र सरकारच्या विरोधात शनिवारी सकाळी निदर्शने केली. स्वयंपाकाच्या गॅसपासून ते पेट्रोलपर्यंत व खाद्यतेलापासून भाजीपाल्यापर्यंत कशाच्याच दरावर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही. नोटाबंदीसारखे चुकीचे निर्णय, कोरोना लसीकरणात नियोजनाचा अभाव यातून जनता त्रस्त झाली आहे, अशी टीका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
केंद्र सरकारच्या विरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या. जनता रस्त्यावर आली तर भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्कील होईल, असा इशारा देण्यात आला. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची भाषणे झाली. महेश हांडे, महेंद्र पठारे, प्रदीप देशमुख, मृणालिनी वाणी, नीलेश निकम, बाळासाहेब बोडके, सर्व विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आंदोलनात सहभागी होते.