जनताच करेल कमळबंदी; राष्ट्रवादीचा कंदील मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:26 AM2018-10-14T01:26:53+5:302018-10-14T01:27:09+5:30
पुणे : वीजकपात व वीजदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी सायंकाळी कंदील मोर्चा काढण्यात आला. संतकबीर चौकापासून निघालेल्या मोर्चाचा ...
पुणे : वीजकपात व वीजदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी सायंकाळी कंदील मोर्चा काढण्यात आला. संतकबीर चौकापासून निघालेल्या मोर्चाचा रास्ता पेठ पॉवर हाऊस येथे समारोप झाला. नोटाबंदी, गॅसबंदी वीजबंदी करणाऱ्या सरकारला यापुढे जनताच कमळबंदी करून धडा शिकवेल, अशी टीका या वेळी करण्यात आली.
शहराध्यक्ष चेतन तुपे, खासदार वंदना चव्हाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सत्तेवर आल्यापासून या सरकारचा एकही निर्णय समाजातील एकाही घटकाला समाधानकारक वाटलेला नाही. देशाचे नुकसान करणारे निर्णय सरकार सातत्याने घेत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बंदी करणाºया या सरकारचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळालाच आता जनता येत्या निवडणुकीत बंदी करेल, असे खासदार चव्हाण यांनी सांगितले. गलथान कारभार करणाºया या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. सत्तेवर येताना दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन सरकार पूर्ण करू शकलेले नाही, असे तुपे म्हणाले.
माजी आमदार बापू पठारे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, नगरसेवक वनराज आंदेकर, लक्ष्मीताई आंदेकर, प्रदीप गायकवाड, भय्यासाहेब जाधव तसेच भगवानराव साळुंखे, अशोक कांबळे, श्रीकांत पाटील, नीलेश निकम, भोलासिंग अरोरा, शशिकांत तापकीर, नितीन कदम, विनायक हनमघर, फहिम शेख, दत्तात्रेय तुपे, अनिसभाई सुंडके, हसिना इनामदार, बाळासाहेब तुपे, गणेश ससाणे, दिनेश मोरे, विक्रम जाधव, विशाल मोरे, विशाल नाटेकर, शांतिलाल मिसाळ, अजिंक्य पालकर, मीनाताई पवार, संजय लोणकर, युसूफ शेख आदी आंदोलनात सहभागी झाले होते.