"अरे या राजकीय नेत्यांना लोकं चपलांनी मारतील", तृप्ती देसाईंचा श्रीकांत देशमुखांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 06:34 PM2022-07-12T18:34:10+5:302022-07-12T18:35:07+5:30

सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूमधील व्हिडीओ एका महिलेने सोशल मिडियावर व्हायरल केल्याने खळबळ उडाली

People will slap these political leaders with sandals Trupti Desai attacks Shrikant Deshmukh | "अरे या राजकीय नेत्यांना लोकं चपलांनी मारतील", तृप्ती देसाईंचा श्रीकांत देशमुखांवर हल्लाबोल

"अरे या राजकीय नेत्यांना लोकं चपलांनी मारतील", तृप्ती देसाईंचा श्रीकांत देशमुखांवर हल्लाबोल

Next

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूमधील व्हिडीओ एका महिलेने सोशल मिडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत एक महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसत-हमसत स्वतःचं नाव सांगते. तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसते. नंतर आलिशान बेडरूममधील डबल बेडवर बनियनवर बसलेल्या या श्रीकांत देशमुख यांच्याकडे मोबाईलचा कॅमेरा करत म्हणते की, 'हा जो माणूस आहे, यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा,' असे म्हणत असताना दचकलेला हा नेता ताडकन बेडवरून उठून पुढं येतो. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. या व्हिडिओवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी श्रीकांत देशमुख यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ''अरे सामान्य जनतेच्या नजरेत तुम्ही चांगलं समजले जाता. अशी कृत्य केली तर लोक काही दिवसानी तुम्हाला चप्पलांनी मारतील.'' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. 

देसाई म्हणाल्या, आज सोलापूरमध्ये एक व्हिडिओ वायरल झाला आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा हा व्हिडिओ आहे. हाच श्रीकांत देशमुख मुंबईत जातो. मला हनी ट्रॅप मध्ये अडकवले जाणार आहे, असे सांगतो. अरे हनी ट्रॅप मध्ये कोण अडकतो. ज्यांना अनैतिक संबंध ठेवतात. त्यांना हनी ट्रॅपची भीती असते. मागच्या वेळी कीर्तनकारांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आत राजकीय नेत्यांचा होऊ लागला आहे. अरे सामान्य जनतेच्या नजरेत तुम्ही चांगलं समजले जात आहेत. अशी कृत्य केली तर लोक काही दिवसानी तुम्हाला चप्पलांनी मारतील. अशी टीका देसाई यांनी केली आहे. 

जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करा 

 सोलापूरच्या या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. त्याला भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे. राजकारण्यांना आपण किती सन्मान दिला पाहिजे. त्यानंतर तो जर चुकतोय तर त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. तरच आपल्या घरातल्या मुली त्याच्या हातून वाचतील असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.    

Read in English

Web Title: People will slap these political leaders with sandals Trupti Desai attacks Shrikant Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.