लोकसहभागाचे पालिकेला वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 02:00 AM2016-03-13T02:00:44+5:302016-03-13T02:00:44+5:30

शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही समस्या सोडविणे महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचाच सहभाग घेऊन प्रत्येक प्रभागात

People's participation in politics | लोकसहभागाचे पालिकेला वावडे

लोकसहभागाचे पालिकेला वावडे

Next

पुणे : शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही समस्या सोडविणे महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचाच सहभाग घेऊन प्रत्येक प्रभागात लोकसहभागातून कचरा समस्या सोडविली जावी या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेले लोकनेते यशवंतराव शहर स्वच्छता अभियान महापालिकेने गुंडाळले आहे.
महापालिकेच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी आधी महापालिका आयुक्तांनी आणि नंतर स्थायी समितीने एक दमडीही ठेवण्याची तसदी घेतली नसल्याने हे अभियान पुढील वर्षापासून बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या अभियानाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी त्यांनी राज्यात अशा प्रकारचे अभियान राबविणाऱ्या पुणे महापालिकेचे विशेष कौतुकही या कार्यक्रमात
केले होते.
राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या धर्तीवर लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्य जन्मशताब्दी निमित्ताने २०१२मध्ये तत्कालीन महापौर वैशाली बनकर यांनी पुढाकार घेऊन हे स्वच्छता अभियान सुरू केले होते. विशेषत: शहरातील घनकचरा व्यवस्थापनात नागरी सहभाग असावा तसेच, आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. त्यात विजेत्या ठरणाऱ्या प्रथम प्रभागास विकासासाठी तब्बल २ कोटी रुपयांचे बक्षीस, दुसऱ्या क्रमांकाच्या प्रभागासाठी दीड कोटी, तिसऱ्या क्रमांकासाठी १ कोटी तर चौथ्या क्रमांकासाठी ७५ लाख रुपयांचे बक्षीस निश्चित करण्यात आले होते. या निधीतून विजेत्या प्रभागामध्ये स्वच्छता प्रकल्प तसेच स्वच्छतेशी संबंधित इतर उपक्रम राबविले जाणार होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी विशेष तरतूदही करण्यात येत होती.
२०१५-१६ च्या अंदाजपत्रकातही या अभियानासाठी तरतूद आहे.
माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी कोणतीही तरतूद नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अभियान पुढील वर्षी बंद करण्यात येणार हे निश्चित झाले आहे.
> गेल्या वर्षभरात शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे जागाच नसल्याने शहरातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी महापालिकेकडून भर दिला जात आहे.
अशा स्थितीत नागरिकांमध्ये जनजागृती आणि प्रभागांमध्येच कचरा जिरविण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. अशा स्थितीत प्रशासन तसेच स्थायी समितीकडूनही या अभियानाबाबत उदासीनता दाखविण्यात
आली आहे.
त्यामुळे महापालिकेकडून एका बाजूला पुणेकरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले जात असताना; दुसरीकडे मात्र, शहराच्या स्वच्छतेसाठीचा लोकसहभाग प्रशासनास नकोसा झालेला असल्याचे समोर आले आहे.
> प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियानां अंतर्गत विविध स्वच्छता उपक्रमांसाठी खर्च केला जात असल्याचे सांगितले. तसेच गेल्या वर्षात या अभियानाचे कोणतेही काम प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे तो निधी वाया गेला आहे. त्यातच महापालिका आयुक्तांनी स्वच्छभारत अभियानासाठी खर्च होत असल्याचे सांगितल्याने या अभियानासाठी निधी ठेवण्यात आलेला नाही.
- अश्विनी कदम (माजी स्थायी समिती अध्यक्षा)

Web Title: People's participation in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.