आरोग्यमंत्र्यांसमोरच लोकप्रतिनिधींनी वाचला तक्रारींचा पाढा; टोपे यांनी प्रशासनाला धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:48 PM2021-05-28T15:48:20+5:302021-05-28T15:50:01+5:30
बहुतेक सर्वच लोक प्रतिनिधींच्या हाॅस्पिटलच्या मनमानी व अधिकच्या बिलासंदर्भात तक्रारी व तीव्र भावना आहेत।
पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी आजच्या कोरोना आढावा बैठकीत लोकप्रतिनिधीनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोर तक्रारींचा पाढाच वाचला. खुद्द खासदार वंदना चव्हाण यांनी देखील शहरात महापालिका प्रशासनाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत केले जात नाही. लोकप्रतिनिधींनी वारंवार सांगून देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले, प्रत्येक बैठकीत अनेक निर्णय घेतले जातात. पण पुढे काय होते ते काहीच कळत नाही. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टोपे यांनी शुक्रवारच्या कोरोना आढावा बैठकीत कोणते निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणी या संदर्भातील माहिती लोकप्रतिनिधींना दर गुरूवारी घरपोच झाली पाहिजे अशी सूचना प्रशासनाला दिली.
पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत आहे. टोपे म्हणाले, कोरोना रुग्णांकडून अवास्तव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना फक्त नोटीसा देऊन काही होणार नाही.आपत्ती कायदा व अन्य सर्व कायद्याचा आधार घेऊन कारवाई करा म्हणजे हाॅस्पिटल जागेवर येतीलरोज लक्ष दिले तर अडचण येत नाही. दररोज बिलांची तपासणी केली तर जरब देखील बसेल. फक्त नोटीसा देऊन काही होणार नाही.आपत्ती कायदा व अन्य सर्व कायद्याचा आधार घेऊन कारवाई करा म्हणजे हाॅस्पिटल जागेवर येतील.
तसेच सहकार विभाग, जिल्हा परिषदेचे ऑडिटर सध्या काही काम नसल्याने बसून आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्येक हाॅस्पिटल प्रत्येक बिल चेक करा. रँडम तपासणी न करता बिल तपासणी सिस्टमचा भाग झाला पाहिजे. बिल कमी झाले हे खरे पण जास्त बिल लावलेल्या हाॅस्पिटलवर काय कारवाई करण्यात आली यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने निश्चित केलेले दर देखील खुपच रास्त आहेत. त्यानंतर देखील रुग्णालये जास्त बिल घेत असतील तर ही गंभीर बाब आहे. शहरातील सर्व खासगी व मोठ्या हाॅस्पिटलची शंभर टक्के बिल चेक करा म्हणजे वास्तव समोर येईल.
किती लोक नियुक्त केले ऑडिटसाठी...
बहुतेक सर्व आमदाराच्या हाॅस्पिटलच्या मनमानी व अधिकच्या बिला संदर्भात तक्रारी व तीव्र भावना आहेत. प्रशासन कारवाईबाबत टाळाटाळ करतंय का? एखाद्या हाॅस्पिटलबाबत काही तक्रार असेल तर थेट माझ्याकडे लेखी तक्रार करा. मी स्वत : यंत्रणेमार्फत तपासणी करून दोषी हाॅस्पिटलवर कारवाई करेल असेही टोपे यांनी स्पष्ट केले.