नागरिकांच्या गाड्यांना बारामतीत ‘नो एंट्री’
By admin | Published: June 6, 2016 12:33 AM2016-06-06T00:33:49+5:302016-06-06T00:33:49+5:30
शासकीय कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बारामती शहरात काही ठिकाणी ‘नो एंट्री’ आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पार्किंगला जागा असून देखील बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली
बारामती : शासकीय कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बारामती शहरात काही ठिकाणी ‘नो एंट्री’ आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पार्किंगला जागा असून देखील बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या पार्किंगच्या जागेवर चक्क अपघातग्रस्त वाहने उभी केली आहेत.
शहर पोलीस ठाणे, नगरपालिका, पंचायत समिती, प्रशासकीय भवन आदी प्रमुख शासकीय कार्यालयामध्ये पार्किंगची समस्या भेडसावत आहे. पोलीस ठाण्यामध्ये पार्किंगच्या ठिकाणीच अपघातग्रस्त वाहने लावलेली दिसतात. त्यामुळे चारचाकी वाहने उभी करण्यास जागा राहात नाही. परिणामी अप्पासाहेब पवार मार्गावर बेशिस्तपणे वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो.
नवीन इमारतीच्या चारही बाजूच्या सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच सुरू केले आहे. हा रस्ता पार्किंगच्या जागेपेक्षा एक फूट खोल आहे. त्यामुळे वाहने पार्किंगमध्ये लावणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पुढील एका महिन्यामध्ये नगरपालिका हे काम पूर्ण करणार आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होईल.
- नीलेश देशमुख, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका