बारामतीत गर्भपाताचा टक्का वाढला
By admin | Published: September 24, 2015 02:55 AM2015-09-24T02:55:30+5:302015-09-24T02:55:30+5:30
बारामतीसारख्या प्रगत तालुक्यात ‘नको असलेल्या’ ‘ती’ किंवा ‘तो’च्या गर्भपात करण्याचा टक्का वाढतच आहे. लिंग निदान होत नसले
महेंद्र कांबळे , बारामती
बारामतीसारख्या प्रगत तालुक्यात ‘नको असलेल्या’ ‘ती’ किंवा ‘तो’च्या गर्भपात करण्याचा टक्का वाढतच आहे. लिंग निदान होत नसले, तरी देखील प्रामुख्याने ‘ति’लाच जगात येण्यापूर्वीच गिळंकृत केले जात असल्याची माहिती पुढे येत आहे. शासकीय रुग्णालयातील नोंदीनुसार व्यंग असलेले, मर्यादित कुटुंब पद्धतीमुळे आताच मुल नको, या मानसिकतेतून गर्भपाताच्या प्रमाणात मागील ५ वर्षांत वाढच झालेली दिसून आली आहे.
धकाधकीच्या जीवनशैलीत विभक्त कुटुंब पद्धतीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. जीवनशैली बदलत असताना, संततीप्राप्तीसाठी लाखो रुपये खर्च करणारी जोडपी आहेत. त्याच बरोबर मुलांना जन्म देण्याचेदेखील नियोजन सुशिक्षित जोडप्यांकडून केले जाते.
गर्भधारणा होऊ नये, यासाठी साधने वापरली, तरीदेखील गर्भधारणा झाली. त्यामुळे ‘आताच मूल नको’ अशा विचारातील दाम्पत्ये गर्भपात करतात.