टक्का वाढला

By admin | Published: October 16, 2014 06:08 AM2014-10-16T06:08:00+5:302014-10-16T06:08:00+5:30

पुणे जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के ५ तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ५९ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे

Percentage increased | टक्का वाढला

टक्का वाढला

Next

पुणे जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के ५ तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ५९ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे.वाढलेले मतदान कोणाच्या पदरात पडणार यावरून पुणे शहर व जिल्ह्यातील पारडे कोठे झुकले आहे याचा अंदाज बांधण्यात नागरिक आणि कार्यकर्ते आज सायंकाळनंतर रंगून गेले होते.गेल्या विधानसभेपेक्षा मतदान ८ टक्के वाढले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत मतदान वाढल्याने अनेक धक्कादायक निकाल लागतील असा राजकीय विश्लेषकांचे अंदाज आहेत. २००९च्या निवडणुकीत शहर व जिल्ह्यात ५४.४४ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत ते वाढून ५७.४२ टक्क्यांपर्यंत गेले. ते आणखी वाढून विधानसभेच्या निवडणुकीत २१ मतदारसंघाची टक्के वारी ६२.५ झाली.
शहरी मतदारसंघांपैकी कसबा व भोसरी मतदारसंघात ५९ टे तर कोथरूडमध्ये ५७ तसेच चिंंचवडमध्ये ५५ पिंपरीत ४६ वडगाव शेरीत ५० शिवाजीनगरमध्ये ५१ टक्के तर हडपसर मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले आहे. पर्वती ५४ खडकवासला ५३ अशी टक्केवारी आहे. मावळ, बारामती, जुन्नर व खेड, भोर,मतदारसंघात प्रत्येकी ७१ टक्के मतदान झाले आहे. पुरंदरमध्ये ७२ तर आंबेगावमध्ये ६७ आणि शिरूर हवेलीत ६९ टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ या तुलनेने संवेदनशील असलेल्या मतदारसंघामध्ये मतदान कमी होईल असा अंदाज व्यक्त होत होता, मात्र सर्वाधिक मतदान करून कसब्याने अपेक्षाभंग केला.
ज्या मतदारसंघांमध्ये राजकीय दृष्ट्या गोंधळाची स्थिती होती अशा मतदारसंघांमध्ये टक्के वारी कमी असल्याचे दिसून येते. रिपब्लिकन मतदारांमध्ये हा गोंधळ असल्याचे दिसून येते.
यंदा सर्वात कमी पुणे कँटोन्मेंटमध्ये ४२ टक्के मतदान झाले आहे. पिंपरी मतदारसंघात ४६ टक्के मतदान झाले.अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजप वगळता अन्य उमेदवार होते. (प्रतिनिधी)

Web Title: Percentage increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.