मतदानाचा वाढला टक्का

By admin | Published: October 16, 2014 05:57 AM2014-10-16T05:57:33+5:302014-10-16T05:57:33+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रांत मतदारांनी रांगा लावून मतदान केले

The percentage of votes increased | मतदानाचा वाढला टक्का

मतदानाचा वाढला टक्का

Next

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रांत मतदारांनी रांगा लावून मतदान केले. भर उन्हातदेखील मतदारांचा उत्साह कायम होता. जिल्ह्यात सरासरी ६२.५ टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीपेक्षा त्यात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता रविवारी (दि. १९) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढली असून, ३०८ उमेदवारांचे भवितव्य त्यावर ठरणार आहे. वाढलेले मतदान नक्की प्रस्थापितांच्या विरोधात जाणार की अन्य काही पर्याय समोर येतात, याबाबत आता खल सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते.
मतदारांनीदेखील तितक्याच उत्साहाने आपले कर्तव्य बजावून भरघोस मतदान केले. बहुतांश मतदारसंघांत पंचरंगी लढत असल्याने मतांचे धु्रवीकरण होऊन धक्कादायक निकाल हाती येतील, असे भाकीत वर्तविण्यात येत होते. तसेच, लढतीदेखील चुरशीच्या होतील, असा अंदाज होता. मात्र, मतदारांनी पुन्हा एकदा चकवा देऊन निकालाच्या अंदाजाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या २००९च्या विधानसभा निवडणुकीत २१ मतदारसंघांची टक्केवारी ५४.४४ टक्के होती, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५७.४२ टक्के होती. रात्री उशिरा हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, मतदान वाढावे यासाठी मतदान केंद्रात मतदारांना नेण्यासाठी वाहने ठेवली होती. याशिवाय नातेगोते, मित्रपरिवार, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ‘आपल्या’ मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा कार्यरत होती. तसेच, जिल्हा प्रशासनाचा ‘जागो मतदार’ रथही मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होता. (प्रतिनिधी)

Web Title: The percentage of votes increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.