जिल्ह्यात ७० टक्के आरटीपीसीआर चाचण्या करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:21+5:302021-03-25T04:12:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या १५-२० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या १५-२० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयसीएमआरने चिंता व्यक्त केली असून जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यात ७० टक्के आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्याची सूचना केली आहे.
जिल्ह्यात घरोघरी जाऊन तापस करा, चाचण्या, ट्रेसिंगवर अधिक भर द्या, गृह विलगीकरणातील रुग्णांवर अधिक लक्ष ठेवा, रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करताना ‘कोरोना पॉझिटिव्ह’ व अन्य गोष्टींचा उल्लेख करा, ‘डेथ ऑडिट’ करा आदी अनेक सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
चौकट
सूचना येण्यापूर्वीच अंमलबजावणी
“जिल्ह्यात सुरुवातीपासूनच टेस्टिंग, ट्रेसिंगवर अधिक भर दिला आहे. घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण देखील करण्यात येत आहे. याशिवाय आयसीएमआरकडून आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.”
-डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी