वढूतील सामाजिक वादाला पूर्णविराम , दोन्ही समाजाची एकत्रित बैैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:31 AM2018-01-05T02:31:13+5:302018-01-05T02:32:31+5:30

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर यापुढे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करताना बाहेरच्या संघटनांचा गावात हस्तक्षेप नको, अशी ठोस भूमिका गुरुवारी ग्रामस्थांनी घेतली.

 The period of social turmoil started, both the community gathered together | वढूतील सामाजिक वादाला पूर्णविराम , दोन्ही समाजाची एकत्रित बैैठक

वढूतील सामाजिक वादाला पूर्णविराम , दोन्ही समाजाची एकत्रित बैैठक

googlenewsNext

कोरेगाव भीमा - श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर यापुढे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करताना बाहेरच्या संघटनांचा गावात हस्तक्षेप नको, अशी ठोस भूमिका गुरुवारी ग्रामस्थांनी घेतली. याठिकाणी मराठा व बौद्ध असा कोणताही वाद नसल्याचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी जाहीर केले. त्यामुळे वढूतील सामाजिक वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे दि. २९ रोजी गोविंद गोपाळ यांच्या समाधिस्थळाच्या नामफलकावरून उद्भवलेला वाद व १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल यामुळे या परिसराची मोठी आर्थिक हानी व जीवितहानी झाल्यानंतर, या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, १ तारखेपासून वढु बुद्रुक, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर या गावांमध्ये दंगलीच्या पार्श्वभूमीवर ३ जानेवारी रात्रीपर्यंत जमावबंदी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने घोषित करण्यात
आली होती.
आज जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून, पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुएझ हक, स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी चारही गावांमधील तणावपूर्ण परिस्थिती निवारणासाठी मराठा व दलित समाजाच्या गावोगावी बैठका घेतल्या. सलोख्याचे वातावरण तयार करण्यावर भर त्यांनी दिला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
या बैैठकीत दोन्ही समाजातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, साहेबराव भंडारे, राजाराम आहेर, सदस्य रमाकांत शिवले, सचिन भंडारे, मारुती भंडारे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, राजेंद्र गायकवाड, श्रीकृष्ण गुरव, पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, शैलश गायकवाड व जालिंदर शिवले, दीपक आहेर, कुणाल भंडारे व पोलीस पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले की, ‘यापुढील काळात वढू बुद्रुक गावात होणाºया धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात बाहेरच्या संघटना व व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये, असा निर्धार व्यक्त करून, तसेच छत्रपती संभाजीराजांचा जयंती व पुण्यतिथीचा कार्यक्रमही ग्रामस्थ व ग्रामपंचायत स्वत: करेल, असाही निर्णय घेण्यात आला.

कोरेगावकरांची चौथ्या दिवशीही गैरसोयच
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस जमावबंदीने गावातील जनजीवन विस्कळीत झाले असताना, आज चौथ्या दिवशी कोरेगाव भीमाचा आठवडा बाजारही प्रशासनाने बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. दरम्यान, आज चौथ्या दिवशी कोरेगाव भीमा, सणसवाडी व वढू बुद्रुक येथील जनजीवन सुरळीत होण्यास
सुरुवात झाली आहे.

वढू येथे आज पुन्हा दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेतली. येथील गोविंद गायकवाड समाधीचे इतिहासकालीन संदर्भ मिळाल्यानंतर, त्यानुसार गोविंद गायकवाड समाधीजवळ फलक लावून समाधिस्थळही पूर्ववत करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.

सणसवाडीकरांचेही सामाजिक एकीचे आवाहन
कोरेगाव भीमा : पोलिसांच्या सामाजिक सलोखा जपण्याच्या केलेल्या आवाहनानुसार सणसवाडी ग्रामस्थानी संयमाची भूमिका घेत सामाजिक एकीचे आवाहन केले.
दरम्यान, येथील मृत राहुल फटांगडे यांच्या कुटुंबीयास १ कोटी नुकसान भरपाई व त्याच्या मारेकºयास तत्काळ अटक करून स्थानिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊनही स्थानिकांवरच गुन्हे दाखल झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात सणसवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीला शिरूर पंचायत समिती उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच राहुल दरेकर, माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे, अजित दरेकर, आशा सोमनाथ दरेकर, वषाताई कानडे, नवनाथ हरगुडे, माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर, युवराज दरेकर, पंडित दरेकर, शिवाजी दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, सोसायटी अध्यक्ष गोरक्ष दरेकर, रांजणगाव गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्या नीता हरगुडे, भानुदास दरेकर, अशोक दरेकर, सोमनाथ दरेकर, नामदेव दरेकर आदींसह गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये ग्रामस्थांनी भूमिका मांडताना सांगितले की,‘ सणसवाडीत सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन सामाजिक सलोखा जपण्याचे काम केले जात असताना गावामध्ये कोणतीही जातियवादी संघटना कार्यरत नाहीत. दरवर्षी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया बांधवांना ग्रामस्थांनी यापूर्वी सुविधा पुरविल्या असून यापुढेही त्यांचे स्वागतच होईल, अशी ग्वाहीही दिली. मात्र यावर्षी वढू, कोरेगावला झालेल्या तणावानंतर स्थानिकांनी आपली दुकाने बंद करावी लागली. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. तरीही स्थानिकांनी अभिवादनासाठी आलेल्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली आहे.
मात्र पूर्वनियोजित द्वेषभावनेने बाहेरुन आलेल्या अज्ञात व्यक्तिंनीच दंगल पसरवली, मात्र त्याचा मोठा फटका वढू-कोरेगाव बरोबरच सणसवाडीतील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. जमाव एवढा प्रचंड होताकी ग्रामस्थांना स्वसंरक्षण करणेही कठीण झाले होते.

Web Title:  The period of social turmoil started, both the community gathered together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.