स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी द्या!

By admin | Published: January 6, 2016 12:47 AM2016-01-06T00:47:51+5:302016-01-06T00:47:51+5:30

बारामती एमआयडीसीसाठी शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते;

Permanent jobs for local landlords! | स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी द्या!

स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी द्या!

Next

बारामती : बारामती एमआयडीसीसाठी शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; मात्र स्थानिक भूमिपूत्रांना नोकरीत सामावून घेतले नाही. उलट परप्रांतीयांची भरती बारामती एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये अधिकारी आणि कामगार संघटनांच्या नेत्यांनी संगनमताने स्थानिकांना डावलून अन्य भागातील कामगारांना नोकरीवर घेतले आहे. या विरोधात स्थानिक भूमिपूत्रांनी ‘एल्गार’ पुकारला आहे. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
२० वर्षांपूर्वी बारामती एमआयडीसीसाठी रुई, तांदूळवाडी, कटफळ, जळोची, वंजारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने संपादित करण्यात आल्या. त्या वेळी
स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत समावून घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांना त्याचा विसर पडला आहे. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमआयडीसीने झटकली.
या कंपन्यांमध्ये कायम कामगार भरतीत स्थानिकांना डावलले जाते. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांच्या मुलांनादेखील न्याय मिळालेला नाही. त्यामुळे परिसरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी भूसंपादन करताना कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. सध्या परिसराचे नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक जीवनमानाचा दुष्परिणाम वाढत आहे. या स्थितीत येत्या ८ दिवसांत एमआयडीसीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपूत्रांना कायम नोकरीसाठी संधी द्यावी, अशी मागणी या परिसरातील तरुणांनी केली आहे.
याबाबत एमआयडीसीचे मुंबईतील मुख्यालय, सर्व कंपन्या, प्रादेशिक कार्यालय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. ८ दिवसांत यावर तोडगा न काढल्यास एमआयडीसीतील पेन्सील चौकात कोणतीही पूर्व कल्पना न देता सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात केली जाईल, असे वंजारवाडी गावचे उपसरपंच दादा चौधर, सदस्य केशव चौधर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Permanent jobs for local landlords!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.