कचरा प्रकल्पांसाठी स्थायीची चालढकल
By admin | Published: April 22, 2015 05:43 AM2015-04-22T05:43:02+5:302015-04-22T05:43:02+5:30
शहरातील कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहीमेस स्थायी समितीकडूनच खोडा घातला जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला
पुणे : शहरातील कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहीमेस स्थायी समितीकडूनच खोडा घातला जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात २ ते ५ टन पर्यंतचे तब्बल ११ लहान प्रकल्प भवानीपेठ आणि कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभागात उभारण्यात येणार आहेत. मात्र, गेल्या दोन बैठकांपासून आधी पाहणीच्या नावाखाली तर आज सदस्य अनुपस्थित असल्याचे कारण पुढे करीत हे प्रकल्प पुढे ढकलले जात आहेत. त्यामुळे शहरातील कचरा शहरातच जिरविण्यावर भर देणार असल्याचे महापालिकने उरूळीदेवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनास हरताळ फासला जात असून येत्या काही महिन्यात शहरातील कचरा समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)