सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फूट गणेश मूर्ती उंचीसाठी परवानगी; मुर्तीकारांचे ४०० कोटींचे नुकसान होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 08:42 PM2020-07-01T20:42:19+5:302020-07-01T20:42:43+5:30
सर्व मूर्ती पीओपी च्या असून १ जानेवारी २०२१ पासून पीओपी मूर्तींना देशात संपुर्ण बंदी केली आहे.परीणामी या मूर्तीचे असेच विसर्जन करावे लागणार आहे.त्यामुळे ४ फुटापेक्षा अधिक उंचीच्या मुर्ती बनविणाºया कारागीरांना आर्थिक
पुणे: राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी कोरोना रोगाच्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साठी यावर्षी फक्त ४ फूट गणेश मूर्ती उंची साठी परवानगी दिलेली आहे.मात्र,राज्याचा विचार करता मूर्ती कारांकडे गणेश मंडळाच्या आर्डर प्रमाणे ४ फुटापेक्षा जास्त उंचीच्या ७०००० एवढ्या मूर्ती बनवून तयार करून ठेवल्या आहेत, त्याचे केवळ रंगकाम बाकी आहे.
या मूर्तींची किंमत अंदाजे ४०० कोटीपेक्षाही जास्त होईल. ह्या सर्व मूर्ती पीओपी च्या असून १ जानेवारी २०२१ पासून पीओपी मूर्तींना देशात संपुर्ण बंदी केली आहे.परीणामी या मूर्तीचे असेच विसर्जन करावे लागणार आहे.त्यामुळे ४ फुटापेक्षा अधिक उंचीच्या मुर्ती बनविणाºया कारागीरांना आर्थिक मदत करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता कुंभार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.त्यानुसार पुणे जिल्यात पुणे शहर, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर ,भोर, मावळ, मुळशी, दौंड व हवेली या भागात मोठे गणपती बनविणारे कुंभार कारागिर आहेत .पुणे जिल्यात गणपती बनविणारे एकुण १८०० एवढे कुंभार असुन त्यातील २०० कारागीर हे ४ फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बनवितात.
राज्याचा विचार केला तर सगळेच जिल्ह्यात गणपती बनवितात.परंतु कोल्हापूर, अलीबाग पेण, सातारा, ठाणे, बीड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपुर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर या जिल्ह्यात फार मोठे प्रमाणावर वर्षभर गणपती बनविण्याचा व्यवसाय चालतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना रोगाच्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साठी यावर्षी फक्त ४ फूट गणेश मूर्ती उंची साठी परवानगी दिलेली आहे.हा सद्य परिस्थितीत एकदम योग्य निर्णय आहे. परंतु मोठ्या गणेश मूर्ती बनविण्यास वेळ लागत असलेमुळे आपले कुंभार मुर्ती कारागीर नेहमी प्रमाणे मोठ्या मूर्ती दिवाळी पासुनच बनविण्यास सुरुवात करतात .त्यामुळे मूर्ति बनविणारे कुंभार कारागिरांकडे ४ फूटापेक्षा जास्त उंचीच्या हजारो मूर्ती बनवून तयार करण्यात आलेल्या आहेत. यातील ९० टक्के पेक्षा जास्त मूर्ती पीओपी च्या आहेत .१ जानेवारी २०२१ पासुन पीओपी वर बंदी आले मुळे त्या मुर्ति पुढील वर्षी कधी ही विकता येणार नाहीत . त्यामुळे आपल्या मूर्ती बनविणारे कुंभार कारागिरांचे त्यांची काहीही चुक नसताना कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. कुंभार कारागिर हे फक्त मूर्ती बनवून त्यांचे कुंटूबाचे चरितार्थ चालवित असतात.या व्यवसायाला लागणारे भांडवल हे मुख्यत: खाजगी सावकाराकडून व्याजाने उभारलेले असते .
मूर्ती विकल्या नंतर त्याची दरवर्षी परतफेड केली जाते.परंतु या वर्षी मूर्ती न विकता आले मुळे सावकारांचे कर्ज कोणतेही कारागिर परत करू शकणार नाहीत.त्यामुळे या कारागिरांवर फार मोठे आर्थिक संकट येणार आहे. करोना हे एक मोठे नैसर्गिक संकट असून शासनाने या संकटामुळे बाधित झालेल्या अनेक घटकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत केलेली आहे. मूर्ती बनविणारे या कारागिरांकडे ४ फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती चे तहसिल कार्यालया मार्फत पंचनामे करून त्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी. या कारागिरांना आर्थिक मदत जर मिळाली नाही तर अनेकांवर नुसतीच उपासमारीची नाही, तर आत्महत्या करण्याची वेळ येवू शकते .याची नोंद घेऊनताबडतोब निर्णय घ्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.