कानिफनाथ गड घाट रस्तादुरुस्तीस वनविभागाने दिली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:34+5:302021-04-09T04:10:34+5:30

वनपरिक्षेत्र अधिकारी यांना श्रीक्षेत्र कानिफनाथ गड घाट रस्तादुरुस्ती परवानगी मिळण्याबाबत ५ ऑक्टोबर २०२० रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. ...

Permission given by Forest Department for repair of Kanifnath Gad Ghat road | कानिफनाथ गड घाट रस्तादुरुस्तीस वनविभागाने दिली परवानगी

कानिफनाथ गड घाट रस्तादुरुस्तीस वनविभागाने दिली परवानगी

Next

वनपरिक्षेत्र अधिकारी यांना श्रीक्षेत्र कानिफनाथ गड घाट रस्तादुरुस्ती परवानगी मिळण्याबाबत ५ ऑक्टोबर २०२० रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता.

श्रीक्षेत्र कानिफनाथगड हे "क" दर्जा प्राप्त असून पर्यटन केंद्र म्हणून सरकार मान्यता घोषित असल्याने नागरिकांच्या व भाविकांच्या सोईसाठी या कामात माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी स्वतः देवस्थान ट्रस्टच्या विनंती वरून लक्ष घातल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री जाधव -जगताप मॅडम व वनपाल समवेत तसेच ट्रस्ट संचालक मंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन वनविभाग सरंक्षण स्थानिक समितीच्या माध्यमातून घाटाच्या रस्त्याचा प्रश्न अखेर निकालात निघाला.

कागदपत्रांची पूर्तता करून काम सुरू करण्याचे ठरले. तसेच भिवरी बोपगाव-शिव हद्दीतील देवस्थान मार्ग मोकळा करण्याबाबत चर्चा करून योग्य प्रकारे मार्गदर्शन करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

या वेळी नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट अध्यक्ष माऊली फडतरे, सचिव जयवंत नाना फडतरे, खजिनदार शिवाजीनाना जगदाळे, संचालक प्रकाशनाना फडतरे, प्रकाश आप्पा फडतरे सुरेश फडतरे, नागेश फडतरे, दीपक फडतरे,माजी सरपंच योगेश फडतरे ,उद्योजक विठ्ठल झेंडे ,पुरंदर पं.स.माजी उपसभापती दत्तात्रय काळे,भिवरी सरपंच संजय कटके आदी उपस्थित होते.

०८ गराडे

श्रीक्षेत्र कानिफनाथ गड ( ता.पुरंदर ) येथे रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाची संयुक्त बैठक.

Web Title: Permission given by Forest Department for repair of Kanifnath Gad Ghat road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.