पेरणे ग्रामपंचायतीकडून वीज कंपनीला २६ कोटींच्या थकीत कराची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:04+5:302021-07-16T04:10:04+5:30
महाराष्ट्र राज्य वीजकंपनीला सुमारे २६ कोटी ९७ लाख ८४ हजार ४९५ रुपयांच्या थकीत कराची नोटीस पाठवून वीजकंपनीलाच शॉक दिला ...
महाराष्ट्र राज्य वीजकंपनीला सुमारे २६ कोटी ९७ लाख ८४ हजार ४९५ रुपयांच्या थकीत कराची नोटीस पाठवून वीजकंपनीलाच शॉक दिला आहे. सध्या वीजकंपनीकडून अनेक ठिकाणी थकीत वीजबील वसुलीच्या मोहिमा सुरु असताना पुर्वहवेलीत मात्र पेरणे ग्रामपंचायतीने कंपनीला चागलाच करड दिला परिसरात याची चर्चा आहे.
याबाबत सरपंच रुपेश ठोबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये महावितरण कंपनीचे १०७ एकर ९ गुठे क्षेत्र वीजकंपनीस हस्तांतरित झाल्यापासुन आजवर नियमानुसार व्यवसाय कर आकारणी करण्याबाबत ग्रामसभेत ठराव करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ कर व फि नियम (६६) भाग ७ (ब) अन्वये यातील मोकळी जागा, पत्राशेड व व्यावसायिक बांधकामांच्या करापोटी सुमारे २६ कोटी ९७ लाख ८४ हजार ४९५ रुपयांच्या थकीत कराची नोटीसही पेरणे ग्रामपंचायतीने ठराव करुन वीजकंपनीला पाठवली आहे.
थकीत रक्कम १५ दिवसांत ग्रामपंचायतीकडे जमा करण्याबाबतचा उल्लेखही या नोटीशीमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान मुदतीत करभरणा न केल्यास पुढे योग्य त्या कायदेशीर कार्यवाहीचाही पर्याय असल्याचे सरपंच रुपेश ठोंबरे यांनी नमुद केले.