हुंड्यासाठी छळ; नवऱ्यासह तिघांना सश्रम कारावास
By admin | Published: April 25, 2017 03:51 AM2017-04-25T03:51:15+5:302017-04-25T03:51:15+5:30
हुंड्याच्या कारणामुळे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आरोपींना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. बडवे यांनी ठोठावली.
बारामती : हुंड्याच्या कारणामुळे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आरोपींना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. बडवे यांनी ठोठावली.
फिर्यादी अनुराधा राजु चव्हाण (रा. साळवेनगर, आमराई, बारामती) यांना आरोपी राजु संदीपान चव्हाण, बेगम संदीपान चव्हाण, सुषमा संदीपान चव्हाण (सर्व रा. आमराई) यांनी संगनमताने माहेरुन हुंडा आणला नाही. तसेच माहेरुन फ्रिज, हिरो होंडा दुचाकी, गॅस आदी वस्तु घेण्यासाठी माहेरहुन पैसे आणावेत. तसेच, फिर्यादीच्या चारीत्र्यावर संशय घेउन अपमान करुन फिर्यादीचे आई -वडिलांना शिवीगाळ करुन शारीरीक, मानसिक छळ केला होता. २५ एप्रिल २००८ पासून ८ एप्रिल २०१४ च्या कालावधीत हा प्रकार घडला. त्यामुळे यातील आरोपीविरुध्द फिर्याद दाखल केली होती.
या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी एम. एम. मागते यांनी तपास पूर्ण करुन आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.(प्रतिनिधी)