भाजप आमदाराच्या मामाची पाच लाखांसाठी हत्या; शेजारीच निघाला मुख्य आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 01:25 PM2024-12-11T13:25:32+5:302024-12-11T13:49:42+5:30

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे

Person living next door killed MLA Yogesh Tilekar maternal uncle Satish Wagh | भाजप आमदाराच्या मामाची पाच लाखांसाठी हत्या; शेजारीच निघाला मुख्य आरोपी

भाजप आमदाराच्या मामाची पाच लाखांसाठी हत्या; शेजारीच निघाला मुख्य आरोपी

Satish Wagh Death : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांची हत्या वैयक्तिक कारणातून झाल्याचे तपासातून पुढं आलं आहे. सतीश वाघ यांच्या हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे पुणेपोलिसांनी सांगितले. सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. यापैकी पाच पैकी तीन आरोपींना पुणेपोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. तसेच सतीश वाघ यांना गाडीत डांबताच खून केल्याचेही उघड झालं आहे.

विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ (वय ५५) यांचे अपहरण केल्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सोमवारी पहाटे सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले होते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या सतीश वाघ यांना चौघांनी जबरदस्तीने एका गाडीत बसवले आणि अपहरण केले. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत अपहरणकर्त्यांनी गाडीतच त्यांचा खून केला. त्यानंतर, वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून आरोपींनी पळ काढला होता. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी मोठा खुलासा झाला आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाबाबत महत्त्वाचे खुलासे केले आहेत. "परवा एक व्यक्तीच्या अपहरण आणि हत्येचे प्रकरण समोर आलं होतं. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका व्यक्तीने वैयक्तिक कारणातून चार लोकांना हत्येची सुपारी दिली होती. सुपारी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. चार आरोपी ताब्यात असून पाचव्या आरोपीचा शोध सुरु आहे. सीसीटीव्ही आणि गाडीच्या तपासावरुन ही घटना उघडकीस आणली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

"गाडीमध्ये एकूण चार आरोपी होती. त्यातील तिघांना अटक झाली आहे. घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच काही वैयक्तिक कारणातून हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणाचा सध्या प्राथमिक तपास सुरु आहे. पकडलेल्या आरोपीपैकी एकाचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आलं आहे," असंही पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

सतीश वाघ यांचा गाडीत डांबताच केला खून

सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर, दहा ते पंधरा मिनिटांत अपहरणकर्त्यांनी गाडीतच त्यांचा खून केला. त्यानंतर, वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून आरोपींनी पळ काढला होता. तीश वाघ हे मॉर्निंग वॉकला जात होते. काळी सव्वासहाच्या सुमारास फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केले होते. या प्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.घ यांच्या अपहरणाची बातमी मिळताच, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. मात्र, वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी त्यांचा गाडीत खून केला. वाघ यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून, लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी त्यांना शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी टाकून पळ काढला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना मिळून आला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली होती.

पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सक्षमच

"आरोपींनी वाघ यांचे अपहरण केल्यानंतर काही मिनिटांत त्यांचा गाडीतच खून केला. पोलिसांना अपहरणाची माहिती मिळताच, वाघ यांच्या सुटकेसाठी काही वेळात तब्बल ४०० ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेटा गोळा केला. अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाडीशी साधर्म्य असलेल्या ५०० मोटारी तपासल्या. अपहरणकर्त्यांचा माग आम्हाला मिळाला होता. त्यानुसार, तपासाला गती देण्यात आली. सर्व शक्यता गृहीत धरून आमचा तपास सुरू होता. अपहरणकर्त्यांनी गाडीतच वाघ यांचा खून केला. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाईचा कोणताही प्रश्न नाही. पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सक्षम असून, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिस तत्परतेने काम करतात. दरम्यान, खून प्रकरणात गुन्हे शाखेने दोघा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. इतर आरोपींसह मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. खून नेमक्या कोणत्या कारणासाठी केला, याची स्पष्टता अजून झाली नाही," अशीही माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Web Title: Person living next door killed MLA Yogesh Tilekar maternal uncle Satish Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.