‘त्या व्यक्ती’ला अखेर रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:45+5:302021-05-13T04:11:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनेक दिवस घरात कोंडून घेऊन उपाशी राहिल्याने प्रकृती नाजूक बनलेल्या राजेंद्रनगरमधील ५० वर्षांच्या त्या ...

‘That person’ was finally admitted to the hospital for treatment | ‘त्या व्यक्ती’ला अखेर रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

‘त्या व्यक्ती’ला अखेर रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अनेक दिवस घरात कोंडून घेऊन उपाशी राहिल्याने प्रकृती नाजूक बनलेल्या राजेंद्रनगरमधील ५० वर्षांच्या त्या व्यक्तीला सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने आज गणेश कला मंच येथील जम्बो सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही व्यक्ती घरातच उपाशी होती. अनेक दिवस काहीही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृती खूप नाजूक बनली होती.

स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना मंगळवारी रात्री नायडू रुग्णालयात नेले होते. तेथे त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. असे असतानाही त्यांना नायडू अथवा ससून रुग्णालयात उपचार केले नव्हते. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा राजेंद्रनगरमधील घरी आणले.

सामाजिक कार्यकर्ते राहुल मानकर यांनी याबाबतची माहिती दिल्यावर ‘लोकमत’ने सामाजिक कार्यकर्ते व शंकरराव भोई फाउंडेशनचे डॉ. मिलिंद भोई यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. डॉ. भोई यांनी स्वत: मंगळवारी रात्री जाऊन तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून ताराचंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे रात्रीच उपचाराला सुरुवात झाली. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज होती. तेव्हा डॉ. भोई यांनी त्यांना गणेश कला येथील जम्बो सेंटरमध्ये दाखल केले.

डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, या गृहस्थाला वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. अनेक दिवस त्यांनी काहीही खाल्ले नसल्याने त्यांच्या फुफ्फुसावर परिणाम झाला होता. त्यांची ऑक्सिजनची पातळी ८० पर्यंत खाली आली होती. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन दिला आहे. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना बोललेले समजते. मात्र, अजूनही बोलण्याची ताकद नाही. त्यांच्याकडील मोबाईल हा लॉक असल्याने तो उघडता येत नाही. मंगळवार रात्रीपासून त्यांच्या नातेवाइकांपैकी कोणीही संपर्क साधला नाही.

राहुल मानकर यांनी सांगितले की, हे गृहस्थ घरात एकाकी राहत होते. त्यांच्या इमारतीच्याच खाली एका डॉक्टरांचे क्लिनिक आहे. परंतु, त्यांनी त्यांच्यावर उपचार करायला नकार दिला. डॉ. मिलिंद भोई हे रात्री तेथे आल्यावर हे डॉक्टर सरळ क्लिनिक बंद करून निघून गेले. त्यांना कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट झाले असतानाही दोघा, तिघांशिवाय कोणीही मदतीला पुढे आले नाही.

Web Title: ‘That person’ was finally admitted to the hospital for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.