मांजराचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:20 IST2023-06-06T19:19:06+5:302023-06-06T19:20:43+5:30
खेड तालुक्यातील चास येथील घटना...

मांजराचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना
राजगुरुनगर (पुणे) : विहिरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ६ रोजी चास ,ता खेड येथे घडली आहे. भगवान केशव काळे (वय ४४ रा. चास ता- खेड ) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चास येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील पेट्रोल पंपाशेजारी विहिरित मांजर पडले होते. पडलेल्या मांजराचा जीव वाचविण्यासाठी मयत भगवान काळे कॅरेट घेऊन पाण्यात उतरले होते. परंतु काळे यांना पोहता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडुन मूत्यू झाला. या घटनेबाबत मयताचे नातेवाईक ममलेश मुरलीधर वाघमोडे याने खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे