दिव्यांग व्यक्तींसह अन्य विशेष व्यक्तींनी पीएमपी पासचे नुतनीकरण करावे

By नितीश गोवंडे | Published: March 29, 2023 04:40 PM2023-03-29T16:40:26+5:302023-03-29T16:40:42+5:30

पासच्या नुतनीकरणाचे वेळी २०२२-२३ चा जुना पास (ओरीजनल), आधार कार्डची झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो जमा करणे बंधनकारक

Persons with Disabilities including other special persons should renew the PMP pass | दिव्यांग व्यक्तींसह अन्य विशेष व्यक्तींनी पीएमपी पासचे नुतनीकरण करावे

दिव्यांग व्यक्तींसह अन्य विशेष व्यक्तींनी पीएमपी पासचे नुतनीकरण करावे

googlenewsNext

पुणे : पुणे मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तींसह विशेष व्यक्तींचे (स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रपती पदक विजेते, राष्ट्रीय खेळाडू) यांचे २०२२-२३ या वर्षासाठी देण्यात आलेल्या मोफत पासची मुदत संपत आल्याने त्यांनी नुतनीकरण करून घ्यावे असे आवाहन पीएमपी तर्फे करण्यात आले आहे. ३१ मार्च रोजी ही मुदत संपत आहे. त्यामुळे १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट येथील मुख्यालयात सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी १० ते दुपारी दीड आणि दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत हे नुतनीकरण करून दिले जाईल.

तसेच पासच्या नुतनीकरणाचे वेळी २०२२-२३ चा जुना पास (ओरीजनल), आधार कार्डची झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो जमा करणे बंधनकारक आहे. तसेच ३० एप्रिल पर्यंत सन २०२२-२३ या वर्षाकरीता देण्यात आलेले मोफत बस प्रवास पास पीएमपीच्या बस मधून प्रवासासाठी ग्राह्य धरले जातील अशी माहिती देखील पीएमपी तर्फे देण्यात आली.

Web Title: Persons with Disabilities including other special persons should renew the PMP pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.