हरणेश्वर लिलाव थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:39+5:302021-04-10T04:10:39+5:30
इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा "हरणेश्वर अॅग्रो या प्रकल्पाचा अवसायक काढुन लिलाव थांबवण्यासाठी कारखाना व्यावस्थापनाने ...
इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा "हरणेश्वर अॅग्रो या प्रकल्पाचा अवसायक काढुन लिलाव थांबवण्यासाठी कारखाना व्यावस्थापनाने बँक व अवसायक यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे अशी माहीती संचालक माऊली चवरे यांनी दिली.
गेली १३ वर्षे बंद असलेला हा कारखाना राजकारणाचा बळी ठरल्याने कर्जाचे प्रमाण मोठे झाल्याने अवसानयात निघाला आहे कर्ज असलेल्या बँकेच्या नियमानुसार न्यायालयीन प्रकियेनुसार २० एप्रिल रोजी कारखान्याचा लिलाव घोषीत झाला आहे यामध्ये मोठी मालमत्ता असुनही कारखाना कवडीमोल किमतीत विकला जाण्याची शक्यता होती त्यामुळे कारखान्याच्या सुमारे १२ हजार सभासदांमध्ये खळबळ उडाली होती त्यामुळे कारखाना व्यावस्थापनाने बँक व अवसायक यांच्याविरोधात सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे यामध्ये कारखाना व्यावस्थापन कर्ज भरण्यास तयार असुन नुकसान भरपाई देवुन लिलाव रद्ध करावा अशी मागणी करण्यात आली आहे अशी माहीती चवरे यांनी दिली.
आता इथेनाँल मिश्रणाचे प्रमाण १० टक्के झाल्याने इथेनाँल निर्मीतीवरच भर देण्याचा व्यावस्थापनाचा मानस आहे
संचालक मंडळाने कारखाना उभारणी साठी सुमारे ६ वर्षे कालावधी लावला पहिल्याच वर्षी शर्कराकंद पासुन इथेनाँल निर्मिती करण्यात यश आले नाही त्यामधील अडचणी व शासन धोरण ओळखुन साखर कारखाना परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न झाला मात्र अंतराची अट आल्याने परवाना दिला गेला नाही त्यामुळे उसापासून गूळ पावडर,निर्मिती करण्यास सुरुवात झाली व गूळ पावडर,यावर ह्या कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली सभासदांचे मोठे नुकसान झाले होते