पेट्रोल दरवाढीचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 09:21 PM2018-04-02T21:21:52+5:302018-04-02T21:21:52+5:30

गेल्या काही काळापासून पेट्राेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ हाेत अाहे. अाज पुण्यात पेट्राेल 81.54 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 67.71 रुपयांवर गेले अाहे. त्यामुळे नागरिकांना याचा भुर्दंड सहन करावा लागत अाहे.

petrol price hike | पेट्रोल दरवाढीचा चटका

पेट्रोल दरवाढीचा चटका

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यात पेट्राेल 10 पैशांनी तर डिझेल 12 पैशांनी महागदरवाढ कमी करण्याची नागरिकांची मागणी

पुणे : पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली असून पुण्यात पेट्रोलच्या दरात १० पैशांनी तर डिझेलच्या दरात १२ पैशांनी वाढ झाली आहे. हि गेल्या काही दिवसांमधील मोठी दरवाढ असून सोमवारी पुण्यात पेट्रोल ८१.५४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६७.७१ रुपयांवर जाऊन ठेपले आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून दैनंदिन बजेट कोलमडल्याची भावना नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. 
    गेल्या वर्षभरापासून रोज पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने बदलत आहेत. अपवाद वगळता या दरांमध्ये वर्षभर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आत्ताची दरवाढ ही दिल्लीतील चारवर्षातील उच्चांकी दरवाढ आहे. दिल्लीत पेट्रोल ७३.७३ तर डिझेल ६४.५८ रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे. त्यामुळे नागरिक या दरवाढीने हैरान झाले असून या दरवाढीवर नियंत्रण आणण्याची मागणी ते करत आहेत. 
    पेट्रोलचे दर दरदिवशी बदलले जात आहेत. रोज या दरांमध्ये काही पैशांची वाढ किंवा घट होत आहे. गेल्या वर्षभरात अशी मोठ्याप्रमाणावर दरवाढ झाली आहे. पैशांमध्ये ही वाढ होत असल्याने नागरिकांना ते लक्षात येत नाही. मात्र रविवारी मध्यरात्री या दरांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे देशातील सर्वच शहरांमधील पेट्रोलचे दर १० ते १८  पैशांनी वाढल्याचे चित्र आहे. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे आपोआपच इतर वस्तूंचे तसेच सेवांचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यात १० आॅक्टोबर २०१७ मध्ये पेट्रोल ७५.५४ रुपये प्रतिलिटर होते तर डिझेल ५८.५९ रुपये इतके होते. सोमवारी मात्र पेट्रोलचा दर वाढून ८१.५४ रुपयावर तर डिझेल ६७. ७१ रुपयांवर जाऊन ठेपले आहे. 
    याबाबत बोलताना सचिन मोकाटे म्हणाले, दररोज बदलणाऱ्या दरांमुळे हळूहळू होणारी दरवाढ लक्षात येत नाही. मात्र आता पेट्रोल ८१ रुपयांवर पोहचल्याने भुर्दंड आम्हाला सहन करावा लागत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. 
    मुग्धा नगरकर म्हणाल्या, रोजच्या दरवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. पेट्रोल वाढले की इतर वस्तूंचे भावही वाढतात, त्यामुळे महिलांचे घरातील बजेट कोसळत आहे. सगळ्यांनाच या दरवाढीचा फटका बसत आहे. पुण्यातील एका पेट्राेलपंपाचे व्यवस्थापक गणपत काेळी म्हणाले, रोज पेट्रोल व डिझेलचे दर बदलत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. मोठी दरवाढ झाल्यानंतर इतके कसे पेट्रोल महाग झाले अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येते. गेल्या काही काळापासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

Web Title: petrol price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.