पेट्रोल पंपातून आले पाणीमिश्रीत पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:15 AM2017-11-10T02:15:58+5:302017-11-10T02:16:08+5:30

कात्रज-देहू बायपासवरील आंबेगाव बुद्रुक येथील शहीद ले. कर्नल प्रकाश पाटील या इंडियन आॅईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर बुधवारी दुपारी साडेतीन ते सहाच्या सुमारास पेट्रोलमधून पाणी

Petrol Pump From Water | पेट्रोल पंपातून आले पाणीमिश्रीत पेट्रोल

पेट्रोल पंपातून आले पाणीमिश्रीत पेट्रोल

Next

आंबेगाव बुद्रुक : कात्रज-देहू बायपासवरील आंबेगाव बुद्रुक येथील शहीद ले. कर्नल प्रकाश पाटील या इंडियन आॅईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर बुधवारी दुपारी साडेतीन ते सहाच्या सुमारास पेट्रोलमधून पाणी विकले गेल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्यातच बंद पडली.
तसेच अनेक वाहने क्रेन लावून गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली. काही जणांनी पेट्रोल पंपावर समक्ष येऊन भेसळयुक्त भरलेले पेट्रोल ओतले. अखेर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अंकित आंबेगाव पठार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज ताटे व एस. एम. खानविलकर व सहकारी पेट्रोलपंपावर पोचले व पेट्रोलपंप तातडीने बंद केला.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांना तत्काळ बोलावून घेतले. तहसीलदारांनी पेट्रोल कंपनी आयओसीचे प्रतिनिधी प्रसाद साठे आणि शुभम अग्रवाल यांच्याकडून पंचासमक्ष स्टोअरेज टँकची तपासणी करून पंचनामा केला. स्टोअरेज टँकमधील एकूण ९६३५ लिटर साठ्यामध्ये तब्बल ५५४ लिटर पाण्याची भेसळ असल्याचे आढळून आले आहे.
तहसीलदारांकडून पेट्रोलचे नमुने सील बंद करून तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले. पेट्रोलपंप चालकाने अनेकजणांचे पेट्रोलचे पैसे परत दिल्याने तसेच गाडी दुरुस्तीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवल्याने अजूनपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. मात्र पेट्रोलमधील इथेनॉलशी पाण्याचा संपर्क आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले करत आहेत.

Web Title: Petrol Pump From Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.