पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:36 PM2018-05-21T18:36:12+5:302018-05-21T18:36:12+5:30

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या चार जणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले.

Petrol pumps arrested for the four preparations for the riot | पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

Next
ठळक मुद्देपोलिसांची चाहूल लागताच तो डाळींब बाजूकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने फरार

लोणी काळभोर : शिंदवणे (ता. हवेली ) येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या चार जणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. या चोरांकडे कोयता, राऊंडसह गावठी पिस्तुल सापडले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार समीर शब्बीर चमनशेख यांनी फिर्याद दिली आहे. 
शुभम ऊर्फ सोन्या कैलास कामठे (वय २३), अक्षय उत्तम कांबळे (वय २१, दोघे रा. मराठी प्राथमिक शाळेमागे, दमवाकवस्ती, ता. हवेली), प्रेम ऊर्फ प्रितम सुनील सुतार (वय २१, रा. बेंदवाडी, ता. हवेली), आकाश प्रकाश काकडे (वय २६, रा. ससाणेनगर, दुर्वांकुर सोसायटी, हडपसर) असे या चोरांची नावे असून ऋषिकेश पवार (रा. कदमवाकवस्ती) हा पाचवा चोर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. रविवारी (२० मे) रोजी पोलिसांना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस रेकॉर्डवरील फरार आरोपी शुभम कामठे हा आपल्या साथीदारांसमवेत दुचाकीवरून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी सासवड येथून शिंदवणे घाट मार्गे येणार असल्याची पोलिसांना सूत्राकडून माहिती मिळताच ते सतर्क झाले. त्याचक्षणी पोलीस पथक त्वरीत वेशभूषा बदलून डाळींब गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून थांबले. या कारवाईत चार जणांना जागीच जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले. तर पाठीमागे काही अंतरावर ॠषिकेश पवार हा डिओ दुचाकी वरून येत होता. त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो डाळींब बाजूकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने फरार झाला. यावरुन पोलिसांना हे सर्वजण पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी तयारीत असल्याची खात्री पटली. अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Petrol pumps arrested for the four preparations for the riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.