पेट्रोल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ
By admin | Published: November 15, 2014 11:55 PM2014-11-15T23:55:48+5:302014-11-15T23:55:48+5:30
पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात दुचाकी आणि पेट्रोल चो:यांसह भुरटय़ा चो:यांच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे.
Next
नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात दुचाकी आणि पेट्रोल चो:यांसह भुरटय़ा चो:यांच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. नीरेतील बाजारतळ परिसरात राजरोसपणो दुचाकी वाहनांमधील पेट्रोल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्न पोलीस यंत्नणा अशा घटनांकडे डोळेझाक करून पेट्रोलचोर टोळीला उलट पाठीशी घालत असल्याचा संशय त्नस्त नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नीरा बाजारतळ परिसरासह काही भागातदेखील अशाच प्रकारे वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना रात्नीच्या वेळी राजरोस घडत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नीरा शहरातील नवीन दुचाक्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, या दुचाकी चोरीची एकही घटना उघडकीस आणण्यास नीरा पोलिसांना अपयश आले आहे. वास्तविक, सध्या नीरा पोलीस दूरक्षेत्नात एक फौजदार, एक पोलीस हवालदार आणि एक पोलीस कर्मचारी असे तीनच पोलीस कमर्चारी काम करीत आहेत. परिणामी जनतेच्या मालमत्तेचे रक्षण होणो अवघड बनले असून, पेट्रोलचोर, दुचाकीचोर, भंगारचोर, अशा भुरटय़ा चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही वर्षापूर्वी गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणारी म्हणून नीरा पोलीस चौकीचा नावलौकिक होता. यासंबंधी सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, जेजुरी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचा:यांची संख्या अपुरी आहे. पोलिसांवर निरनिराळे बंदोबस्त आणि दैनंदिन कामकाज याचा ताण येत असून, अपु:या संख्याबळामुळे नीरा पोलीस चौकीत गरजेइतका पोलीस कर्मचारीवर्ग नियुक्त करणो अवघड बनले आहे. जेजुरी ठाण्यात अधिक प्रमाणात वीस पोलीस कर्मचा:यांची नियुक्ती करावी, अशी वरिष्ठांकडे मागणी प्रलंबित आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगून नीरेतील पेट्रोलचोर टोळीला लवकरच कारवाई करून पकडण्यात येईल. रोडरोमियोंवर कारवाई सुरु असून, नीरा शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम प्राधान्याने पोलीस करतील, अशी ग्वाही रामदास शेळके यांनी दिली. (वार्ताहर)
4नीरा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाहनांमधील पेट्रोल चोरीला जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मध्यंतरी अशा पेट्रोल चोरणा:या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, अशी माहिती उपलब्ध होत आहे. मात्न संबंधित पेट्रोल चोरटय़ांना पोलिसांनी ‘अर्थ’पूर्ण व्यवहारामुळे मोकाट सोडून दिले. त्यानंतर काही दिवस पेट्रोल चोरीचा घटना थांबल्या, परंतु पेट्रोल चोरीचे प्रकार पुन्हा घडू लागल्याने पेट्रोल चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचे उघड झाले आहे.