‘फेसबुक’वर पोस्ट टाकून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:55 AM2017-07-30T03:55:34+5:302017-07-30T03:55:42+5:30

फेसबुकवर ‘मी जातो’ अशी पोस्ट टाकून कर्वेनगर परिसरातील एका उद्योजकाने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना शनिवारी सकाळी घडली.

phaesabaukavara-paosata-taakauuna-atamahatayaa | ‘फेसबुक’वर पोस्ट टाकून आत्महत्या

‘फेसबुक’वर पोस्ट टाकून आत्महत्या

Next

पुणे : फेसबुकवर ‘मी जातो’ अशी पोस्ट टाकून कर्वेनगर परिसरातील एका उद्योजकाने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना शनिवारी सकाळी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी उद्योजकाने ‘मी जातो’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले, तरी त्याने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चैतन्य फडके (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : फडके यांनी २०१४ मध्ये एनर्जी नेक्स्ट सोल्युशन कंपनी सुरू केली होती. त्यांचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्याच्या गर्तेत होते. शनिवारी सकाळी त्यांची पत्नी आणि आई कामानिमित्त बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘मी जातो’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकल्यानंतर त्यांच्या मित्रांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
मित्रांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र फडकेंनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर
या घटनेची माहिती पोलिसांना
देण्यात आली.

Web Title: phaesabaukavara-paosata-taakauuna-atamahatayaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.