पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया डिसेंबरअखेरीस

By admin | Published: December 9, 2014 12:15 AM2014-12-09T00:15:32+5:302014-12-09T00:15:32+5:30

सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील रिक्त असलेल्या पीएच.डी.च्या जागांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिनाअखेरीस सुरू होणार

Ph.D. By the end of the entry process at December | पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया डिसेंबरअखेरीस

पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया डिसेंबरअखेरीस

Next
पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील रिक्त असलेल्या पीएच.डी.च्या जागांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिनाअखेरीस सुरू होणार असून, त्या संदर्भातील अंतिम वेळापत्रकावर येत्या मंगळवारी (दि. 9) अधिष्ठातांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. परिणामी, विद्यापीठाच्या रिक्त असलेल्या पीएच.डी.च्या 4 हजार 355 जागांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर 2क्14 ते फेब्रुवारी 2क्15 या कालावधीत  पूर्ण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या विविध विभागांमधील व संलग्न संशोधन केंद्रामधील पीएच.डी.च्या रिक्त जागांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठात सर्व विद्याशाखांच्या अधिष्ठातांची बैठक मंगळवारी घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भातील जाहिरात केव्हा द्यावी, प्रवेश अर्ज शुल्क किती आकारावे, विद्याथ्र्याना अर्ज भरण्यास किती कालावधी द्यावा आदी मुद्दय़ांवर चर्चा केली जाणार आहे. डिसेंबर महिनाअखेरीस सुरू  होणा:या या प्रवेश प्रक्रियेत खुल्या वर्गातील विद्याथ्र्यासाठी 2 हजार 575 जागा असून एस.सी. प्रवर्गासाठी 675, एस.टी. प्रवर्गासाठी 131, तर ओबीसी प्रवर्गासाठी 647 जागा उपलब्ध आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार विद्यापीठांनी वर्षातून दोन वेळा पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबविणो आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाने गेल्या शैक्षणिक वर्षात केवळ एकदाच प्रवेश प्रक्रिया राबविली होती. परंतु, चालू शैक्षणिक वर्षात विद्यापीठातर्फे दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे पीएच.डी. करणा:या विद्याथ्र्यानी डिसेंबरअखेरीस प्रवेश अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
विद्यापीठातील विविध विभागांमधील मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लष्कर,  वकील, पोलीस, पत्रकारिता, उद्योग अशा विविध क्षेत्रंचा सुमारे 1क् ते 15 वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा यंदाही संबंधितांना व्यक्तींना दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)
 
विद्याशाखारिक्त जागा
कला, ललित कला व प्रयोगजीवी कला462
मानस, नीती व समाजविज्ञान346
विज्ञान1565
विधीक्3
अभियांत्रिकी834
वाणिज्य51क्
शिक्षणशास्त्र83
औषधनिर्माणशास्त्र3क्3
व्यवस्थापनशास्त्र2क्9
शारीरिक शिक्षणशास्त्र34

 

Web Title: Ph.D. By the end of the entry process at December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.