पीएच.डी. पात्रता परीक्षेत १८ डॉक्टरांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:51+5:302021-03-14T04:10:51+5:30

एकाच वर्षी, पहिल्याच प्रयत्नात एकाच कॉलेजच्या शिक्षकांना एवढ्या संख्येने प्रवेश मिळण्याची ही भारतात पहिलीच वेळ असून, हा कदाचित एक ...

Ph.D. Success of 18 doctors in eligibility test | पीएच.डी. पात्रता परीक्षेत १८ डॉक्टरांचे यश

पीएच.डी. पात्रता परीक्षेत १८ डॉक्टरांचे यश

Next

एकाच वर्षी, पहिल्याच प्रयत्नात एकाच कॉलेजच्या शिक्षकांना एवढ्या संख्येने प्रवेश मिळण्याची ही भारतात पहिलीच वेळ असून, हा कदाचित एक विक्रमच असेल व ही आपल्या संस्थेसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब असून, त्यातील ८ डॉक्टरांना राज्यातील विविध कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळाला आहे अशी माहिती डॉ. कणसे दिली.

पीएच.डी. पात्र डॉक्टरांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरस्वती कणसे व संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. निखिल कणसे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

पीएच.डी. पात्रता परीक्षेत यश मिळविणाऱ्या १८ पैकी संस्थेत कार्यरत असलेले डॉ. संध्या थोरात, डॉ. सविता जराड, डॉ. मालती शिंदे, डॉ. विभावरी खुपटे, डॉ. अम्रिता रॉड्रिग्ज, डॉ. स्नेहल पाटील या सर्वांबरोबरच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कणसे व विद्यमान अध्यक्षा डॉ. सरस्वती कणसे या आठ जणांना पीएच.डी.साठी प्रवेश मिळाला आहे.

Web Title: Ph.D. Success of 18 doctors in eligibility test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.