फेथाई चक्रीवादळ उद्या दुपारी आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 08:43 PM2018-12-16T20:43:50+5:302018-12-16T20:54:16+5:30
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडुकडून आता आंध्रप्रदेश व पाँडेचरीच्या दिशेने वळविली आहे. ते आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम ते काकीनाडा दरम्यानाच्या किनारपट्टीला सोमवारी १७ डिसेंबरला दुपारनंतर धडकण्याची शक्यता आहे.
पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडुकडून आता आंध्रप्रदेश व पाँडेचरीच्या दिशेने वळविली आहे. ते आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम ते काकीनाडा दरम्यानाच्या किनारपट्टीला सोमवारी १७ डिसेंबरला दुपारनंतर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिणेतील सर्व राज्यात दिसून येणार असून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे १०़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
फेथाई चक्रीवादळ रविवारी सकाळी मच्छलीपट्टणम येथून ५६० किमी तर, चेन्नईपासून ४६० किमी आणि काकीनाडापासून ६०० किमी दूर होते. हे चक्रीवादळ सोमवारी सकाळी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, किनारपट्टीवर धडकताना त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील गोदावरी, विशाखापट्टणम, कृष्णा, गुंटूर जिल्हा व पाँडेचरीमधील यामान जिल्ह्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
राज्यात विदर्भातच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. १७ व १८ डिसेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.