सकारात्मकतेसाठी विनोदाचे तत्वज्ञान उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:32+5:302021-05-03T04:07:32+5:30

डॉ. रामचंद्र देखणे : ऑनलाईन हास्ययोगात ४००० लोकांचा सहभाग पुणे : आज कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या भवताली अनेक आप्तेष्ट, जवळच्या ...

The philosophy of humor is useful for positivity | सकारात्मकतेसाठी विनोदाचे तत्वज्ञान उपयुक्त

सकारात्मकतेसाठी विनोदाचे तत्वज्ञान उपयुक्त

Next

डॉ. रामचंद्र देखणे : ऑनलाईन हास्ययोगात ४००० लोकांचा सहभाग

पुणे : आज कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या भवताली अनेक आप्तेष्ट, जवळच्या व्यक्ती गमावल्याने आपल्यावर दुःख कोसळत आहे. अशावेळी आनंदाचे दोन क्षण जगत पुन्हा सकारात्मक होण्यासाठी विनोदाचे तत्वज्ञान उपयोगी पडणार आहे. हास्ययोगाने ज्येष्ठांना या कठीण काळातही चैतन्यमय राहण्यास मदत होत आहे'', असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.

नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ऑनलाईन जागतिक हास्ययोग दिवस (दि. २ मे) उत्साहात साजरा केला. पुण्यासह देश-परदेशातून ४००० पेक्षा अधिक लोकांनी ऑनलाईन हास्ययोग केला. ''हास्य, आनंद आणि तत्वज्ञान'' या विषयावर डॉ. रामचंद्र देखणे यांचे उद्बोधन झाले. फेसबुक व युट्युबवर हा ऑनलाईन सोहळा हजारो लोकांनी लाईव्ह पाहिला. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, सुमन काटे, मकरंद टिल्लू, पी. के. सिंघवी, विजय भोसले, प्रमोद ढेपे आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक यांनी शुभेच्छा संदेश दिले.

विठ्ठल काटे म्हणाले, "कोरोनामुळे ज्येष्ठांचा व्यायाम बंद झाला. परिणामी, शारीरिक व्याधी, मानसिक दुर्बलता उद्भवू लागल्या. तेव्हा नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन हास्ययोग वर्ग भरवला. ज्येष्ठ नागरिकांचा घरबसल्या व्यायाम चालू झाला. हजारो ज्येष्ठांचे शरीर-मनाचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत झाली. नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत ऑनलाईन योग-प्राणायाम आणि हास्ययोग वर्ग सुरु झाले. आज जवळपास १००० कुटुंबातील २००० लोक रोज ऑनलाईन योग आणि हास्ययोग करत आहेत."

हास्ययोग प्रशिक्षक मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. पी. के. सिंघवी यांनी प्रास्ताविक केले. विजय भोसले यांनी आभार मानले.

-----

श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा अनेक महान साहित्यिकांनी विनोदाची परंपरा तत्त्वज्ञानाच्या अंगाने अधोरेखित केली. निखळ हास्य पेरणाऱ्या विनोदी साहित्याची आणि विनोद समजून घेणाऱ्यांची आज वानवा दिसते. व्यंग्यचित्रांतून हास्यविनोद होत असतो. मात्र, साहित्यात व्यंग्यचित्रकाराला फारसे महत्व दिले जात नाही.

- रामचंद्र देखणे

Web Title: The philosophy of humor is useful for positivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.