फोनची रिंग वाजतच असते

By admin | Published: February 18, 2017 03:42 AM2017-02-18T03:42:21+5:302017-02-18T03:42:21+5:30

शिवसेनेचे शहरप्रमुख, माजी आमदार विनायक निम्हण. परिस्थितीशी टक्कर देत शून्यातून साम्राज्य निर्माण केल्याने पाषाणमधील बंगल्याला

The phone has a ring at the same time | फोनची रिंग वाजतच असते

फोनची रिंग वाजतच असते

Next

विश्वास खोड / पुणे
शिवसेनेचे शहरप्रमुख, माजी आमदार विनायक निम्हण. परिस्थितीशी टक्कर देत शून्यातून साम्राज्य निर्माण केल्याने पाषाणमधील बंगल्याला नाव ‘झुंज’. त्यावर भगवा डौलाने फडकत असलेला. सकाळी पावणेसहालाच झोपेतून उठतात. आवरून सायकल चालवतच जिमला जातात. मनसोक्त व्यायाम करून झाल्यावर पावणेनऊच्या सुमारास पुन्हा घरी. आंघोळ, देवपूजा केल्यानंतर थेट जेवणच.
घरातून निघतानाच जेवून निघण्याचा जुना शिरस्ता. घरात असताना पूर्णपणे कुटुंबवत्सल असलेले निम्हण घराबाहेर पडले की समाजाचे होऊन जातात. मग रात्री साडेआठ/नऊपर्यंत अधिकाधिक वेळ समाजकार्यात, राजकारणात आणि काही वेळ स्वत:च्या व्यवसायात ते पूर्णपणे रमलेले असतात.
सध्या निवडणुकांची धामधूम असल्याने सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागते. रात्री घरी पोचायला उशीरही होतो.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजलेले असतात. सोबत घरचा डबा घेऊन निम्हण आपल्या दिवसभराच्या मोहिमेवर निघतात.
जे काम करतो ते आनंदाने, त्यामुळे कायम फ्रेश असतो, असे त्यांचे म्हणणे. जे काही काम करायचे त्याचा पूर्ण अभ्यास आणि नियोजन केले की काम चांगले होते. तेच आपल्या यशाचे रहस्य असे ते मानतात. सकाळी ९ पासूनच कार्यकर्त्यांचे फोन सुरू झालेले. ‘आबा’ असे टोपणनाव कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध. फोनमध्ये नंबर फीड असो नसो, चर्चा, मार्गदर्शन, समस्या निवारण सुरू असते. त्यात खंड नसतो.
कोणी प्रचारासाठी, पदयात्रेसाठी या असा आग्रह धरून सतत फोन करत असलेला. शहराच्या वेगवेगळ्या भागांतल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधून कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, पलीकडच्या उमेदवाराकडून काही त्रास आहे का? काही अडचणी आहेत का? अशी चर्चा करता करता प्रवास सुरू असतो. कामाच्या व्यग्रतेमध्येही व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागतेच. भांडारकर रस्त्यावरील आॅफिसमध्ये जाऊन ते काही वेळ कामकाज करतात. वडगावशेरीमधील २ प्रभागांमध्ये आणि सिंहगड रस्त्यावरील २ प्रभागांमध्ये पदयात्रांमध्ये काही वेळ सामील होऊन ते कार्यकर्ते आणि उमेदवारांचा उत्साह वाढवतात.
सध्या जरा दगदग, दमछाक वाढली आहे. त्यामुळे थोडीशी वामकुक्षी. पुन्हा फोनाफोनी सुरू. बोपोडी, पाषाण भागात कॉर्नर बैठका सुरु असतात, त्यांना हजेरी लावून घरी येईपर्यंत रात्रीचे पावणेनऊ वाजलेले असतात. कुटुंबासोबत गप्पा टप्पा, आणि जेवण. रात्री उशीरापर्यंत फोन सुरुच असतो.

Web Title: The phone has a ring at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.